ETV Bharat / entertainment

आलियाला बाहुपाशात घेतलेला रणबीरचा प्री-वेडिंग फोटो

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या एका ताज्या फोटोत रणबीर आपल्या वधूला आपल्या बाहूमध्ये प्रेमाने घेताना दिसला आहे. हा फोटो मेहंदी समारंभाच्या आधी 13 एप्रिल रोजी सकाळी झालेल्या पूजा प्रसंगाचा आहे.

आलिया रणबीरचा प्री-वेडिंग फोटो
आलिया रणबीरचा प्री-वेडिंग फोटो
author img

By

Published : Apr 25, 2022, 1:33 PM IST

Updated : Apr 25, 2022, 7:17 PM IST

मुंबई - सोनी राझदानची बहीण टीना राजदान यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या उत्सवातील एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये रणबीर आलियाच्या गळ्याभोवती हात धरून बसलेला दिसत आहे. फॅम-जॅम स्नॅपमध्ये रणबीरची आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर साहनी, आलियाचे वडील महेश भट्ट, आणि तिची बहीण शाहीन भट्ट, आई सोनी राजदान, रणबीरची मावशी रिमा जैन आणि चुलत बहीण निताशा नंदा आणि भाची समारा देखील दिसत आहेत.

हा फोटो मेहंदी समारंभाच्या आधी 13 एप्रिल रोजी सकाळी झालेल्या पूजा प्रसंगाचा आहे. या प्रसंगी, आलियाने केशरी रंगाचा सूट निवडला तर रणबीरने पांढरा कुर्ता परिधान केला होता. त्याची बहीण रिद्धिमा हिने बेज कुर्ता निवडला आणि त्याची भाची समारा गुलाबी कुर्त्यात आहे. टीना रझदानने पोस्टला कॅप्शन दिले, "एक विस्तृत होत जाणारे अंतर्गत वर्तुळ.'' या फोटोला अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. "कुटुंब," असे सोनी राजदान कमेंट केली आहे. रिद्धिमाने कमेंट विभागात लाल हार्ट इमोजीची एक स्ट्रिंग टाकली आहे.

दरम्यान, नवविवाहित जोडपे कामावर परतले आहेत. रणबीर हिमाचल प्रदेशमध्ये रश्मिका मंदान्नासोबत संदीप रेड्डी वंगा यांच्या ''अॅनिमल''च्या शूटिंगसाठी बिझी झाला आहे. दुसरीकडे, आलिया करण जोहर दिग्दर्शित "रॉकी और रानी की प्रेम कहाणी" या चित्रपटात रणवीर सिंगसोबत काम करीत आहे.

हेही वाचा - पाहा, 'बर्थडे गर्ल' श्रिया पिळगावकरचे अप्रतिम फोटो

Last Updated : Apr 25, 2022, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.