मुंबई - Ranbir Kapoor viral photo : अभिनेता रणबीर कपूर सध्या 'अॅनिमल' चित्रपटामुळं चर्चेत आहे. रणबीरच्या 'अॅक्शन' आणि थ्रिलर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप खळबळ उडवून दिली आहे. हा चित्रपट सध्या प्रचंड कमाई रुपेरी पडद्यावर करत आहे. रणबीरच्या या चित्रपटानं 20 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'अॅनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूर त्याच्या पुढील प्रोजेक्टच्या तयारीसाठी न्यूयॉर्कला गेला आहे. दरम्यान रणबीर कपूरचा एक फोटो व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. आता ही मिस्ट्री गर्ल कोण आहे हे जाणून घ्या.
कोण आहे ही मिस्ट्री गर्ल? : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत रणबीर कपूर एका मुलीसोबत डिनर करताना दिसत आहे. पत्नी आलिया भट्ट व्यतिरिक्त रणबीर कपूर कोणत्या मुलीसोबत डिनर करत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रणबीर कपूरसोबत दिसणारी ही मुलगी अमेरिकेत राहत असणारी बॉलिवूड स्टार संजय दत्तची लाडकी लेक त्रिशाला दत्त आहे. त्रिशालानं रणबीरसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रणबीर आणि त्रिशाला खूप सुंदर दिसत आहे. त्रिशालाचा आवडता अभिनेता रणबीर कपूर आहे हे क्वचितच लोकांना माहित असेल.
रणबीरचा 'संजू' चित्रपट : रणबीरनं 'संजू' या बायोपिकमध्ये त्रिशालाचे वडील संजय दत्त यांची भूमिकाही साकारली आहे. यामुळं त्रिशालासाठी रणबीर कपूर आणखी खास अभिनेता बनला आहे. 'अॅनिमल'च्या आधी रणबीरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट 'संजू' होता. 'संजू' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जगभरात 586 कोटींचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट 29 जून 2018 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. 'संजू' दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं होत. या चित्रपटाचं बजेट 96 कोटी होत. या चित्रपटामधील गाणी खूप लोकप्रिय झाली आहे. हा चित्रपट अनेकांना पसंत पडला होता.
हेही वाचा :