मुंबई - Raha Kapoor birthday : रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहा हिचा पहिला वाढदिवस 6 नोव्हेंबर रोजी अतिशय उत्साहात साजरा झाला. यासाठी रणबीर आलियानं बॉलिवूड सेलेब्रिटींना आमंत्रित करुन शानदार पार्टी दिली. मुंबईतील प्रायव्हेट शेफ्स क्लबचे मुख्य शेफ हर्ष दीक्षित यांनी अलीकडेच रणबीर आणि आलियासोबत कलीनरी स्टाफसह एक फोटो शेअर केला आहे. या खास दिवसासाठी तयार करण्यात आलेल्या अप्रतिम पाककृतीचा खुलासाही त्यांनी यामध्ये केलाय.
![Raha Kapoor birthday](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-11-2023/19962032_alia.jpg)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांची मुलगी राहा कपूरसाठी त्यांच्या घरी एक शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. प्रायव्हेट शेफ क्लबनं हेड शेफ हर्ष दीक्षित सोबत फूड डिपार्टमेंट कुशलतेने हाताळलं आणि रणबीर आणि आलिया या अभिमानी पालकांसोबत पाककलेचा स्नॅपशॉट शेअर केला. त्यांनी फ्राईज, रिबन सँडविच, ब्री चिली चीज टोस्ट, टॅको, डोसा आणि इतर विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ असलेले एक अप्रतिम जेवण बनवल्यामुळे पार्टी संस्मरणीय ठरली.
आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टनं तिच्या इंस्टाग्राम चाहत्यांना आज छोट्या भाचीच्या वाढदिवसाच्या उत्सवातील एक झलक दाखवली. तिनं राहा नावाने सुशोभित केलेल्या एक नंबरच्या आकारातील वैयक्तिक कुकीचा फोटो पोस्ट केला.
![Raha Kapoor birthday](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-11-2023/19962032_shahee.jpg)
शाहीन भट्टनं वाढदिवसासाठी रणबीर आणि आलियाच्या घरात केलेली सजावटही दाखवली आहे. फोटोत एलईडी दिव्यांसह फुगे आणि 1 चा आकडा सजवलेला कॉर्नर दिसतोय. शाहीननं तिच्या पोस्टसह हार्ट इमोटिकॉनसह एक सुंदर मेसेजही लिहिला आहे.
![Raha Kapoor birthday](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-11-2023/19962032_birthday.jpeg)
काही काळ डेटिंग केल्यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरी आयोजित समारंभात लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्याच वर्षी 6 नोव्हेंबर रोजी या जोडप्याला मुलगी झाली. राहा असं नाव असलेल्या या मुलीचा पहिला वाढदिवस त्यांनी आनंदानं साजरा केला.
हेही वाचा -
2. Tiger 3 Song Ruaan Out: 'टायगर 3'मधील 'रुआन' गाणं प्रदर्शित, पाहा रोमँटिक लिरीकल व्हिडिओ