ETV Bharat / entertainment

Ranbir Alia return Mumbai : दुबईच्या सुट्टीवरून मुंबईला परतले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, पहा त्यांची झलक - हार्ट ऑफ स्टोन

Ranbir Alia : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या दुबईच्या सुट्टीवरून मुंबईत परतले आहेत. काल रात्री मुंबई एअरपोर्टवर हे कपल मस्त लूकमध्ये दिसले. पाहा त्यांची सुंदर झलक.

Ranbir Alia return Mumbai
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
author img

By

Published : Jun 30, 2023, 1:46 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे सध्या त्यांच्या दुबई सुट्टीमुळे विशेष चर्चेत आहे. हे जोडपे २९ जूनच्या रात्री सुट्टीवरून घरी परतले. काल रात्री हे जोडपे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. रणबीर आणि आलिया कॅज्युअल ड्रेसमध्ये खूपच मस्त दिसत होते. रणबीर आलियाने अद्याप तिच्या व्हेकेशनचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही, पण दोघांचेही कपूरचे सतत त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आहेत.

दोन दिवसापूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दुबईतील एका मॉलमध्ये मुलगी राहासाठी खरेदी करताना दिसली आणि एका चाहत्याने हा फोटो शेअर केला. त्याचवेळी आलिया भट्टच्या आगामी रॉकी और राणी की प्रेम कहानी चित्रपटातील एक गाणे यापूर्वी रिलीज झाले होते आणि त्यानंतर आलियाने एक रील बनवून ते सोशल मीडियावर शेअर केले होते. तुम क्या मिले असे बोल असलेले हे गीत अमिताभ बट्टचार्य यांनी लिहिले आहे. संगीतकार प्रीतम यांनी स्वरसाज चढवलेले हे गीत प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने गायले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. निसर्गाच्या सुंदर बर्फाळ लोकेशनवर हे गाणे चित्रीत झाले आहे.

रणबीर आलियाचा एअरपोर्ट लूक पाहिला तर रणबीरने ब्लू शर्टवर डेनिम आणि व्हाइट शूट घातलेला होता. तर आलिया भट्ट फ्रीस्टाइल कॉस्च्युम लूकमध्ये दिसली. आलियाने तिच्या आकारापेक्षा मोठ्या लूज-फिटिंग पांढर्‍या शर्टवर सैल पँट घातली होती. विमानतळावर हे जोडपे खूपच रुबाबदार दिसत होते आणि रणबीर कपूर पत्नी आलियासोबत अधिक सकारात्मक दिसत होता.

या स्टार कपलच्या वर्क फ्रंटकडे पाहता, आलिया भट्ट यावर्षी हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तर रणबीर कपूरचा 'एनिमल' हा चित्रपटही ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. याआधी आलियाचा रॉकी और राणी की प्रेम कहानीहा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

१. Lust Stories 2 : लस्ट स्टोरीज 2 स्टार तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी शेअर केला त्यांच्या डेटिंग अनुभवाबद्दलचाा खुलासा

२. Naming Ceremony : पाहा, राम चरण आणि उपासनाच्या मुलीच्या बारशाची जय्यत तयारी

३. Zhzb Box Office Collection Day 28 : 'जरा हटके जरा बचके'ने 28 व्या दिवशी केली एक कोटींपेक्षा कमी कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.