हैदराबाद - Ramoji Film City : रामोजी फिल्म सिटीमध्ये विंटर फेस्ट सेलिब्रेशन हे जोरदार सुरू आहे. रामोजी फिल्म सिटीत हिवाळी महोत्सवानिमित्त फिल्म सिटी आता पर्यटकांनी गजबजली आहे. शनिवारी, फिल्मसिटीमध्ये खूप गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान पर्यटक सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत फिल्मसिटीला भेट देण्याचा आणि खास मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात. कार्निव्हल परेडच्या वेळी आणि संध्याकाळी विद्युत दिव्यांच्या प्रकाशात फिल्मसिटी ही खूप सुंदर दिसते. या आकर्षक देखाव्याला पाहण्यासाठी अनेकजण रामोजी फिल्ममध्ये हजेरी लावत आहेत.
![Ramoji Film City](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-12-2023/mdk161223-3d_1712newsroom_1702777042_453.jpg)
रामोजी फिल्म सिटीत विंटर फेस्ट सेलिब्रेशन : भारतीय सिनेमाच्या 110 व्या वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेले विशेष नृत्य सादरीकरण मनोरंजनाचा आनंद आता पर्यटक घेऊ शकतात. सुंदर बागा, चित्रपट सेटिंग, मुलांसाठी अनुकूल राइड्स, युरेका शॉपिंग, स्टंट शो पाहण्यासाठी पर्यटक फिल्मसिटीला भेट देऊन गोड आता आठवणी बनवत आहेत. रामोजी विंटर फेस्ट ही एक मजेदार कार्निव्हल परेड आहे, जे पर्यटकांना आनंदाच्या किनाऱ्यावर आणते. आकर्षक फिल्मसिटी मार्गांवर कार्निव्हल परेड तुम्हाला सुंदर वाटेल. आकर्षक कलाकारांचे परफॉर्मन्स, स्टिल्ट वॉकर्स, आणि मोबाईल डीजे बीट्सचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
![Ramoji Film City](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-12-2023/mdk161223-3b_1712newsroom_1702777042_642.jpg)
रामोजी फिल्म सिटी विंटर फेस्ट सोहळ्यासाठी विशेष पॅकेजेस उपलब्ध : 28 जानेवारीपर्यंत सुरू राहणार्या रामोजी विंटर फेस्ट सोहळ्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता आणि अविस्मरणीय आठवणी तयार करू शकता. उत्सवादरम्यान, ज्यांना फिल्मसिटी हॉटेल्समध्ये राहून उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी विशेष मुक्काम पॅकेजेस उपलब्ध आहेत. ज्यांना हिवाळी महोत्सवात सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी विविध विशेष पॅकेजेस उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी योग्य असलेले पॅकेज निवडण्याची आणि कुटुंब आणि मित्रांसह हिवाळी उत्सवात सामील होण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये संध्याकाळी, पर्यटकसाठी विशेष उत्सवांसह लाइव्ह डीजे परफॉर्मन्स असेल. दरम्यान तुम्ही या विशेष पॅकजचा लाभ घेऊ शकता.
हेही वाचा :