मुंबई - अक्षय कुमार अभिनीत 'राम सेतू'ने पहिल्या दिवसाच्या इंडिया नेट बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 15 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तेरे बिन लादेन फेम अभिषेक शर्मा दिग्दर्शित, अॅक्शन-अॅडव्हेंचर ड्रामा मंगळवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अक्षय-स्टारर चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या थँक गॉडला मागे टाकले आहे.
बुधवारी निर्मात्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, राम सेतू चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 15.25 कोटी झाली. हा चित्रपट एका नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञातून आस्तिक बनलेल्या डॉ आर्यन कुलश्रेष्ठ (कुमार) भोवती फिरतो, ज्याला वाईट शक्तींनी भारताच्या वारशाचा स्तंभ नष्ट करण्यापूर्वी पौराणिक राम सेतूचे खरे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काळाशी झुंज द्यावी लागते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
केप ऑफ गुड फिल्म्स आणि लायका प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राम सेतू प्राइम व्हिडिओने सादर केला आहे. या चित्रपटाला अरुणा भाटिया (केप ऑफ गुड फिल्म्स), विक्रम मल्होत्रा (अबंडंटिया एंटरटेनमेंट), सुबास्करन, महावीर जैन, आणि आशिष सिंग (लायका प्रॉडक्शन) आणि प्राइम व्हिडिओ यांचे सर्जनशील निर्माता म्हणून डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी (सम्राट पृथ्वीराज) यांचे समर्थन आहे. झी स्टुडिओने जगभरातील चित्रपटगृहांमध्ये राम सेतूचे वितरण केले आहे.
-
Jai Shree Ram!
— Abundantia (@Abundantia_Ent) October 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thank you for all the love! ✨
Watch #RamSetu in cinemas with your entire family.https://t.co/0b96vphbDe https://t.co/5nywAP9VVs@akshaykumar @asli_jacqueline @nushrratt @actorsatyadev pic.twitter.com/LspV5HrNLj
">Jai Shree Ram!
— Abundantia (@Abundantia_Ent) October 26, 2022
Thank you for all the love! ✨
Watch #RamSetu in cinemas with your entire family.https://t.co/0b96vphbDe https://t.co/5nywAP9VVs@akshaykumar @asli_jacqueline @nushrratt @actorsatyadev pic.twitter.com/LspV5HrNLjJai Shree Ram!
— Abundantia (@Abundantia_Ent) October 26, 2022
Thank you for all the love! ✨
Watch #RamSetu in cinemas with your entire family.https://t.co/0b96vphbDe https://t.co/5nywAP9VVs@akshaykumar @asli_jacqueline @nushrratt @actorsatyadev pic.twitter.com/LspV5HrNLj
दुसरीकडे थँक गॉड हा चित्रपटही 25 ऑक्टोबर रोजी देखील पडद्यावर आला. त्याने पहिल्या दिवशी 8.10 कोटी रुपये कमावले आहेत. इंद्र कुमार दिग्दर्शित, थँक गॉडमध्ये रकुल प्रीत सिंग देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट एका व्यक्तीवर आधारित आहे जो कनिष्ठ मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गात जाण्याची आकांक्षा बाळगत असतो आणि एका अपघातानंतर तो चित्रगुप्ताला भेटतो. चित्रगुप्त त्याला स्वर्गात की नरकात पाठवायचे यासाठी त्याची परीक्षा घेतानाची धमाल यात दाखवण्यात आली आहे.
हेही वाचा - ''घर बंदूक बिरयानी''चा गुढ टिझर रिलीज, आकाश ठोसर, सयाजी शिंदेसह नागराजचा नवा सिनेमा