ETV Bharat / entertainment

Raksha Bandhan 2023 : तैमूर आणि जहांगीरला राखी बांधण्यासाठी सारा अली खानचा उत्साह कॅमेऱ्यात कैद - अमृता राव

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान तिच्या धाकट्या भावांना राखी बांधण्यासाठी करीना कपूर खानच्या घरी पोहोचली. करीनाच्या घरी प्रवेश करताना पापाराझीनी तिला स्पॉट केले आहे.

Sara Ali Khan
सारा अली खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 6:56 PM IST

मुंबई : आज देशभरात रक्षाबंधन उत्साहात साजरे केला जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. तर काही स्टार्स सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना राखीसाठी शुभेच्छा देत आहे. दरम्यान आता, बी-टाउनची सुंदर अभिनेत्री सारा अली खान आपल्या सावत्र भावांना राखी बांधण्यासाठी करीना कपूर खानच्या घरी पोहोचली. सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सारा करीना कपूरच्या घरात जाताना दिसत आहे. यावेळी साराने पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. साराने शरारा ड्रेसवर हलका मेकअप केला आहे. याशिवाय तिने आपले केस मोकळे सोडले आहे. या लूकमध्ये सारा ही खूप सुंदर दिसत आहे.

राखी बांधण्यासाठी सारा पोहचली सैफकडे : करिनाच्या घरी जाण्यापूर्वी साराने थांबून पापाराझीला पोझ दिली. त्यानंतर सारा घराच्या आत गेली. साराचे वडील सैफ अली खान यांनी करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले आहे. सैफ अली खान आणि करीना कपूरला तैमूर आणि जहांगीर अली खान ही दोन मुले आहेत. राखीसोबतच साराने तिच्या भावांसाठीही अनेक भेटवस्तू आणल्या आहेत. ड्रायव्हर या भेटवस्तू घरात घेऊन जाताना दिसला. सारा अली खानचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सारा ही खूप जास्त इंस्टाग्रामवर सक्रिय असते, त्यामुळे या खास प्रसंगी ती ही पोस्ट नक्कीच शेअर करेल.

सारा अली खान भडकली मीडियावर : अमृता रावची मुलगी सारा अली खान काही दिवसांपूर्वीच एका मॉलमध्ये स्पॉट झाली होती. यादरम्यान ती मीडियावर संतापताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. सारा अली खानला मीडियावर राग येण्याची ही पहिलीच वेळ होती. तिचे हे रूप यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. दरम्यान साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटी विक्की कौशलसोबत 'जरा हटके जरा बचके' चित्रपटात दिसली होती. ती अनुराग बसूच्या 'मेट्रो इन दिनो' मध्ये दिसणार आहे. याशिवाय 'ए वतन मेरे वतन', 'मर्डर मुबारक' मध्ये देखील दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Jawan pre release event: चेन्नई विमानतळावर 'किंग खान'चे जल्लोषात स्वागत, 'जवान' प्री रिलीज इव्हेन्टसाठी भव्य मंच सज्ज
  2. Kanhaiya Twitter Pe Aja: विकी कौशल बनला भजन कुमार, 'द ग्रेट इंडियन फॅमिली'तील 'कन्हैया ट्विटर पे आजा' गाणे रिलीज
  3. Mamata Banerjee in Mumbai : ममता बॅनर्जी रक्षाबंधनासाठी 'जलसा'वर जाणार, अमिताभ बच्चन यांनी दिलं निमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.