मुंबई - मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे तिला खूप वेदना सहन कराव्या लागल्या. पती आदिल खान दुर्रानी यांनी राखीला स्वीकारल्यानंतर ती थेट तुरुंगात जाईल याची कल्पनाही करवत नाही. राखीच्या अटकेमागे वादग्रस्त मॉडेल शर्लिन चोप्रा कारणीभूत होती. शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी राखीला गुरुवारी (19 जानेवारी) अटक केली आणि दीर्घ चौकशीनंतर तिला घरी पाठवण्यात आले. पोलिस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर राखीने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. राखीने याबाबत एक वेदनादायक पोस्ट शेअर केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पोलिसांनी राखीला का अटक केली? - चित्रपट निर्माता साजिद खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी शर्लिन चोप्राने राखी विरुध्द तक्रार दाखल केल्याने तिला अटक झाली होती. राखीने गेल्या वर्षी एका मीडिया कॉन्फरन्समध्ये शर्लिनचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला होता. या संदर्भात शर्लिनने नोव्हेंबर 2022 मध्ये राखीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक करून 6 तासांहून अधिक काळ तिची चौकशी केली.
घरी आल्यानंतर राखीने तिच्या वेदना सांगितल्या - पोलिसांच्या चौकशीनंतर घरी आल्यावर राखी सावंत पूर्णपणे तुटून पडली आणि अश्रूंच्या प्रत्येक थेंबाच्या वेदना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. राखी सावंतने एक हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट शेअर केली आहे ज्यात लिहिले आहे, 'सर्वात मौल्यवान द्रव कोणता असेल तर तो आहे अश्रू . अश्रूत 1% पाणी आणि 99% भावना असतात त्यामुळे कोणाला दुखवण्यापूर्वी दोनदा विचार करा'. या पोस्टवर राखीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे खरे आहे'.
चाहते दिलासा देत आहेत - आता या दुःखद पोस्टवर चाहते राखीचे सांत्वन करत आहेत. राखीच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, 'तुला नक्कीच न्याय मिळेल, काळजी करू नकोस'. एका चाहत्याने लिहिले आहे की, 'तुमच्या घराकडे लक्ष द्या आणि असे दुःखी होऊ नका, आयुष्यात सुख-दु:ख फक्त येतात आणि जातात. राखीच्या जबरा फॅनने लिहिले की, 'तुझी काळजी घे राखी, आम्ही तुझा खूप आदर करतो, काश्मीरमधून तुझ्यावर खूप प्रेम करतो'. राखीचे असे अनेक चाहते आहेत जे तिला या संकटाच्या वेळी धीर देण्यास सांगत आहेत. चाहत्यांच्या या प्रेमामुळे राखीला निश्चितच बरं वाटत असेल.
हेही वाचा - Rakhi Sawant Police Inquiry : मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री राखी सावंतची चौकशी; वाचा, काय आहे प्रकरण?