ETV Bharat / entertainment

Raju Srivastava health update राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत गंभीर

राजू श्रीवास्तव ( Raju Srivastava ) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने कॉमेडियनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत गंभीर

author img

By

Published : Aug 12, 2022, 2:23 PM IST

Updated : Aug 12, 2022, 3:25 PM IST

नवी दिल्ली - लोकप्रिय कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव ( Raju Srivastava ) दिल्लीतील एम्सच्या ( AIIMS ) अतिदक्षता विभागात (आयसीयू) "अत्यंत गंभीर आणि व्हेंटिलेटरवर" असल्याचे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. 58 वर्षीय श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा ( heart attack ) झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी ( angioplasty ) करण्यात आली.

“श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असून ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत,” असे सूत्राने एका न्यूजवायरला सांगितले. कॉमेडियनवर एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीश नाईक उपचार करत आहेत.

श्रीवास्तव यांचे चुलत भाऊ अशोक श्रीवास्तव यांनी बुधवारी संध्याकाळी सांगितले होते की, राजू श्रीवास्तवला व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. "तो आपला नियमित व्यायाम करत होता आणि ट्रेडमिलवर असताना तो अचानक खाली पडला. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला ताबडतोब एम्स रुग्णालयात नेण्यात आले," असे त्याने सांगितले होते. अभिनेता-कॉमेडियन राजूची पत्नी शिखा श्रीवास्तव दिल्लीत पोहोचली आहे.

श्रीवास्तव हे चित्रपट विकास परिषदेचे उत्तर प्रदेशचे विद्यमान अध्यक्ष आहेत. श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या एका दिवसानंतर, गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला. स्टँड-अप कॉमेडियनच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी हॉस्पिटलच्या संचालकांना फोन केला.

विशेष म्हणजे राजू श्रीवास्तव यांनीही राजकारणात काम केले आहे. त्यांनी राजकारणी म्हणून 2014 मध्ये समाजवादी पक्षातून कारकिर्दीला सुरुवात केली आणि महिनाभरातच त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. कॉमेडियन 2014 मध्ये समाजवादी पक्षाच्या वतीने लोकसभेच्या तिकिटावर कानपूरमधून निवडणूक लढवणार होते, परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट नाकारले होते. त्यावेळी राजनाथ सिंह हे अध्यक्ष होते.

हेही वाचा - Laal Singh Chaddha Box Office Day 1:आमिरचे १३ वर्षातील सर्वात कमी ओपनिंग पण रक्षाबंधनाला टाकले मागे

Last Updated : Aug 12, 2022, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.