ETV Bharat / entertainment

IIFA 2023 : यंदाच्या आयफामध्ये राजकुमार राव दाखवणार त्याचे होस्टिंग टॅलेंट - आयफा होस्ट जकुमार राव

अभिनेता राजकुमार राव आयफा 2023 मध्ये त्याचे होस्टिंगचे कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज आहे. राजकुमार राव 26 मे रोजी आबू धाबी येथे 'आयफा 2023 रॉक्स' कार्यक्रमाचे सह-होस्टिंग करणार आहे.

RajKummar Rao
राजकुमार राव
author img

By

Published : May 9, 2023, 5:06 PM IST

मुंबई: बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आपल्या होस्टिंग कौशल्य आयफा 2023 आबू धाबीमध्ये दाखण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलीवूडच्या प्रतिष्ठित पुरस्कार कार्यक्रमाचे काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. राजकुमार यावर्षी 26 मे रोजी अबू धाबी येथे आयफा रॉक्स कार्यक्रमध्ये सह-होस्टिंग करणार आहे. हा कार्यक्रम अबू धाबीत यस आयलंडमध्ये पार पडेल. बरेली ते यस आयलंड, अबू धाबी पर्यंत, #RajkummarRao शोभा रियल्टी IIFA रॉक्स 2023 होस्ट म्हणून आमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे, अशी पोस्ट करण्यात आली आहे.

आयफा होस्ट जकुमार राव : या बातमीमुळे राजकुमारचे चाहते उत्साहित झाले आहेत. ही बातमी मिळताचं सोशल मीडिया अनेकांजण कमेंट करत आहे. काही चाहत्यांनी लिहले आहे की, 'वाह... तो आमच्यातील सर्वोत्तम प्रतिभांपैकी एक आहे. त्याच्या होस्टिंग कौशल्याचा साक्षीदार होण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही'. तर दुसर्‍याने लिहिले, 'मुख्य पुरस्कार सोहळ्यापूर्वी आयोजित, IIFA रॉक्स भारतीय सिनेमाचे संगीत आणि फॅशन हायलाइट करते. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत संगीतकार यंदाच्या गाण्याने जादू करतील, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला अभिषेक बच्चन आणि विकी कौशल सुद्धा होस्ट करतील व हा कार्यक्रम 27 मे रोजी बघायला मिळेल.

अभिषेक बच्चन आणि विकी कौशल करणार होस्टिंग : अभिषेक बच्चन या कार्यक्रमासाठी फार उत्सुक आहे, असे त्यांनी सांगितले. शिवाय त्याने म्हटले की, 23व्या आईफा कार्यक्रमाचे आयोजन करताना मी फार आनंदी आहे. माझ्यासाठी हा कार्यक्रम माझ्या कुटुंबासारखा आहे. मी मनोरंजनासाठी, चाहत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी जागतिक स्तरावर संपर्क साधण्यासाठी उत्सुक आहे. आयफा हे एकमेव जागतिक व्यासपीठ आहे, ज्याने जगभर प्रवास केला आहे. त्याने जगभरातील सिनेप्रेमींना जवळ केले आहे. नेहमीप्रमाणेच, मी आयफा पुढीच्या कार्यक्रमासाठी आणि पुरस्कारांची वाट पाहत असतो. मी सह-होस्टिंग करण्यास उत्सुक आहे. IIFA 23 व्या कार्यक्रमाबद्दल तो पुढे म्हणाला, IIFA 2023 हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट प्रतिभेचा भव्य सोहळा आहे, ज्यामध्ये जागतिक मान्यवर, आंतरराष्ट्रीय मीडिया, चाहते आणि जगभरातील चित्रपट रसिक एकत्र येतात. हा कार्यक्रम पर्यटन, व्यवसाय आणि व्यापार आणि चित्रपट निर्मिती व्यवसायात दीर्घकालीन प्रभावासाठी अधिक संधी सादर करत असतो. IIFA पुरस्कारांसाठी नामांकन हे डिसेंबर 2022 मध्ये जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा : Salman Khan death threat: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी: मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात लुकआउट नोटीस केली जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.