ETV Bharat / entertainment

Rajkumar Rao became national icon : राजकुमार राव बनला निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन - Rajkumar Rao national icon

Rajkumar Rao became national icon : अभिनेता राजकुमार राव याची निवडणूक आयोगानं नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे. मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक मंडळ प्रमुख व्यक्तींची 'नॅशनल आयकॉन' म्हणून नियुक्ती करते.

Rajkumar Rao became national icon
राजकुमार राव नॅशनल आयकॉन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 4:00 PM IST

नवी दिल्ली - Rajkumar Rao became national icon : राजकुमार राव याची नॅशनल आयकॉन म्हणून निवडणूक आयोगानं निवड केली आहे. नव तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याच्या हेतुने त्याची निवड करण्यात आलीय. राजकुमार राव याचा न्यूटन हा चित्रपट याच विषयावर प्रेरणा देणारा ठरला होता.

  • राजकुमार राव चुनाव आयोग के नये ब्रांड एम्बेसडर। इनकी फ़िल्म न्यूटन चुनाव और सिस्टम से जुड़ी बेहतरीन फ़िल्म थी । pic.twitter.com/OaWVs0683d

    — Narendra Nath Mishra (@iamnarendranath) October 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'न्यूटन' या चित्रपटात छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका अभिनेता राजकुमार रावने साकारली होती. या चित्रपटात तो एका सरकारी लिपिकाच्या भूमिकेत दिसला होता. नक्षलग्रस्त भागात निवडणूकीची एव्हीएम मशीन्स पोहोचतात. त्यासोबत निवडणूक अधिकारी, मतदान प्रक्रिया पार पाडणारे कर्माचारी, सुरक्षा रक्षकासह मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीनं मतदार मतदान केंद्राकडे फिरकत नाहीत. सर्व कर्मचारी कंटाळतात, पण न्यूटन मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी योजना आखतो. परिणामी नक्षवाद्यांच्या रडारवर तो येतो. एक निवडणूक कर्मचारी कशा पद्धतीनं ही लढाई जिंकतो याची रंजक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. या चित्रपटानं हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आणि ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीसाठी भारताच्या वतीने पाठवण्यात आला होता.

यापूर्वी निवडणूक आयोगानं अभिनेता पंकज त्रिपाठी, आमिर खान, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी आणि एमसी मेरी कोम यांना नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक मंडळ प्रमुख व्यक्तींची 'नॅशनल आयकॉन' म्हणून नियुक्ती करते.

कामाच्या आघाडीवर राजकुमार राव लवकरच जान्हवी कपूरसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'चित्रपटामध्ये दिसणार आहे. यामध्ये राजकुमार राव हा महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेत तर जान्हवी कपूर ही महिमा नावाच्या भूमिकेत असेल. 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. तारखेची घोषणा करताना, धर्मा प्रोडक्शनने लिहिलं, 'शरण शर्मा दिग्दर्शित आणि 'राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' 15 मार्च 2024 रोजी तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येत आहे!. हा चित्रपट करण जोहर, झी स्टुडिओज, हिरू यश जोहर आणि अपूर्व मेहता निर्मित आहे. याशिवाय राजकुमार हा अलिकडेच रिलीज झालेल्या 'स्त्री 2' चित्रपटामध्येही दिसला होता.

हेही वाचा -

  1. Deepika Ranveer Wedding Video : दीपिका आणि रणवीर सिंगची वेडिंग फिल्म्स 'कॉफी विथ करण 8' मध्ये लॉन्च

2. Elvish Yadav Extortion Call: एल्विश यादवकडून खंडणी मागणारा गजाआड

3. Aayush Sharma Birthday: सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माला पत्नी अर्पिता खाननं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.