हैदराबाद - सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट लाल सलाम चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांतची मुलगा ऐश्वर्या रजनीकांत करत आहे. लाल सलामच्या पोस्टरमध्ये रजनीकांत मोईद्दिन भाई म्हणून 1993 मध्ये मुंबईत झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरुन चालताना दिसतोय. पोस्टरला इंटरनेट युजर्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, काहींनी ते अधिक चांगले असायला हवे होते असे म्हटले आहे.
लाल सलाममधील रजनीकांतचा फर्स्ट लूक - रजनीकांतचा फर्स्ट लूक शेअर करताना, 'मुलगी ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, मोईद्दिन भाईचे स्वागत आहे. जेव्हा तुमचे हृदय धडधडत असते तेव्हा कॅप्शन देऊ शकत नाही! लाल सलाम !!' लायका प्रॉडक्शनने पोस्टर इंग्रजी आणि तमिळमध्ये शेअर केले आणि रजनीकांत यांना 'प्रत्येकाचा आवडता भाई' असे म्हटले. असे असले तरी मोईद्दिन भाईच्या रूपातील रजनीकांतचा फर्स्ट लूक सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवण्यात अपयशी ठरला आहे. बरेच लोक यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया - एका सोशल मीडिया युजर्सने लिहिले की, हे काय आहे? तुम्ही थलायवाचे काय करुन ठेवलंय. दुसऱ्याने लिहिलंय, हे पोस्टर मागे घ्या, खूप खराब फोटोशॉप झालंय. तर आणखी एकाने सर्वात वाईट पोस्टर म्हटलंय. मात्र रजनीकांतच्या डाय हार्ट चाह्यांना यात काहीही वावगं वाटत नाही. त्यांनी थलायवाचे भरभरुन कौतुक केले आहे. हा चित्रपट वेगळा आणि मनोरंजक असल्याचे म्हणत रजनाकांतला रुपेरी पडद्यावर पाहायला उतावीळ झाल्याचे लिहिले आहे.
रजनीकांतची अनोखी भूमिका - लाल सलाममध्ये रजनीकांत आजवरच्या अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट फ्लोवर शुटसाठी जदाखल झाला. गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला पूजा समारंभ झाल्यानंतर हा चित्रपट लाँच करण्यात आला होता. या कार्यक्रमातील फोटो शेअर करत ऐश्वर्याने तिच्या ट्विटर पेजवर लिहिले, 'जेव्हा तुमचे वडिल तुमच्यावर विश्वास ठेवतात.. तेव्हा तुमचा विश्वास असतो की देव तुमच्यासोबत आहे. चमत्कार खरे घडतात. 7 वर्षानंतर प्रवास पुन्हा सुरू होतोय... कृतज्ञता आणि आनंद अश्रूं.' या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. यात ए आर रहमानचे संगीत असेल.