हैदराबाद - मेगास्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूतील प्रसिद्ध अन्नामलैयार मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्याच्या आगामी 'लाल सलाम' या चित्रपटाच्या शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत त्याने मंदिराच्या पायऱ्या चढल्या. या मंदिरात तो सामान्य भाविकांसारखा दर्शनासाठी आला होता.
-
#Superstar @rajinikanth who is in #Tiruvannamalai for #LaalSalam shoot offered his prayers at the famous #Annamalaiyaar temple.. pic.twitter.com/FeQwCFC3Wt
— Ramesh Bala (@rameshlaus) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Superstar @rajinikanth who is in #Tiruvannamalai for #LaalSalam shoot offered his prayers at the famous #Annamalaiyaar temple.. pic.twitter.com/FeQwCFC3Wt
— Ramesh Bala (@rameshlaus) July 1, 2023#Superstar @rajinikanth who is in #Tiruvannamalai for #LaalSalam shoot offered his prayers at the famous #Annamalaiyaar temple.. pic.twitter.com/FeQwCFC3Wt
— Ramesh Bala (@rameshlaus) July 1, 2023
रजनीकांतने अन्नामलैयार मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्याचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये रजनीकांत अतिशय साधा दिसत आहे. यावेळी रजनीने फक्त हलक्या तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि धोतर परिधान केले होते. रजनीकांत या पवित्र मंदिरात प्रवेश केल्यावर त्याची झलक पाहण्यासाठी गावकरी, भाविक व चाहत्यांची तुडुंब गर्दी मंदिरात झाली होती.
सुपरस्टार रजनीकांत आपली मुलगी ऐश्वर्याच्या लाल सलाम दिग्दर्शित चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मंदिराला भेट दिली. या वर्षाच्या सुरुवातीला शुटिंग फ्लोरवर गेलेल्या चित्रपटात रजनीकांत विस्तारित कॅमिओची भूमिका साकारत आहेत. लाल सलाम मधील मोईदीन भाई म्हणून रजनीचा पहिला लूक प्रसिद्ध झाल्यानंतर काहीजणांनी त्याच्यावर टीकास्त्रही सोडले होते.
दरम्यान, रजनीकांत नुकतेच मुंबईत होते. मुंबईत त्यांनी जवळपास आठवडाभर लाल सलामचे शूटिंग केले. रजनीकांतने प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासोबतही चित्रीकरण केले होते. लाल सलाम चित्रपटात कपिल देवची पाहुण्यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते. रजनीकांत यांनी मुंबईत चित्रीकरण करत असतानाचा स्वतःचा आणि कपिल देव यांचा फोटो शेअर केला आहे. तब्बल सात वर्षानंतर ऐश्वर्या पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत परतली आहे. लायका प्रॉडक्शनने बनवलेला, लाल सलाम या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही वाचा -