ETV Bharat / entertainment

''मोठे नुकसान...,'' म्हणत रजनीकांत, चिरंजीवीनी वाहिली कृष्णा यांना श्रध्दांजली - Rajinikanth and Krishna

महेश बाबूचे वडील सुपरस्टार कृष्णा यांचे मंगळवारी हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

कृष्णा यांचे मंगळवारी हैदराबाद येथे निधन

author img

By

Published : Nov 15, 2022, 1:35 PM IST

हैदराबाद - रजनीकांत यांनी दिवंगत अभिनेते आणि महेश बाबू यांचे वडील घटामनेनी कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली. सुपरस्टार कृष्णा यांचे मंगळवारी हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

रजनीकांत यांनी सुपरस्टार कृष्णा यांच्यासोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. याची आठवण ठेवत रजनीकांत यांनी लिहिले, "कृष्णा गरू यांचे निधन हे तेलुगू चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान आहे... त्यांच्यासोबत 3 चित्रपटांमध्ये काम करणे या माझ्या आठवणी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या हार्दिक संवेदना ...त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

  • The demise of Krishna garu is a great loss to the Telugu film industry … working with him in 3 films are memories i will always cherish. My heartfelt condolences to his family …may his soul rest in peace @urstrulyMahesh

    — Rajinikanth (@rajinikanth) November 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुपरस्टार कृष्णा यांच्या निधनावर रजनीकांत व्यतिरिक्त इतर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. कृष्णाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी अभिनेता चिरंजीवीने आपल्या मातृभाषेत एक लांबलचक चिठ्ठी लिहिली आहे.

ज्यू. एनटीआरने लिहिले, "माझे विचार महेश अण्णा आणि कुटुंबासोबत आहेत. ओम शांती. सुपरस्टार सदैव."

  • కృష్ణ గారు అంటే సాహసానికి మరో పేరు. ఎన్నో ప్రయోగాత్మక చిత్రాలు, విలక్షణమైన పాత్రలే కాకుండా, సాంకేతికంగా కూడా తెలుగు సినిమాకు ఎన్నో విధానాలు పరిచయం చేసిన మీ ఘనత ఎప్పటికి చిరస్మరణీయం.

    My thoughts are with Mahesh Anna and the family.

    Om Shanthi. Superstar forever.

    — Jr NTR (@tarak9999) November 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महेश बाबूचे वडील कृष्णा यांना सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिनेता कृष्णा यांच्यावर हैदराबादमधील कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार आणि निरीक्षणासाठी त्यांना आयसीयूमध्ये हलवले होते. सोमवारी संध्याकाळी डॉक्टरांच्या हेल्थ बुलेटिननुसार प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

महेश बाबूसाठी २०२२ हे वर्ष फार चांगले राहिले नाही. जानेवारीमध्ये त्यांनी त्यांचा मोठा भाऊ रमेश बाबू गमावला आणि सप्टेंबरमध्ये त्यांनी त्यांची आई इंदिरा देवी गमावली.

त्यांच्या काळातील प्रमुख अभिनेत्यांपैकी एक असलेले सुपरस्टार कृष्णा, हे मूळत: घटामनेनी शिव रामा कृष्ण मूर्ती म्हणून ओळखले जात असत. त्यांनी सुमारे 350 चित्रपट केले. ते निर्माता आणि दिग्दर्शकही होते. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता.

1965 मध्ये त्यांनी अदुर्थी सुब्बा राव यांच्या रोमँटिक ट्रेमा थेने मनसुलु या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.

हेही वाचा - एकाच वर्षात महेश बाबूच्या आई, भाऊ आणि वडीलांचा मृत्यू, टॉलिवूडवर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.