ETV Bharat / entertainment

Leo Movie : विजय थलपथीला सुपरस्टार रजनीकांतनं दिल्या 'लिओ' चित्रपटासाठी शुभेच्छा... - रजनीकांत

Leo Movie : साऊथचा सुपरस्टार विजय थलपथीचा 'लिओ' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी मेगास्टार रजनीकांत यांनी विजयला 'लिओ'च्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leo Movie
लिओ चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 5:32 PM IST

Updated : Oct 16, 2023, 5:40 PM IST

मुंबई - LEO Movie : साऊथ फिल्म इंडस्ट्रीत थैमान घालणारा मेगास्टार थलपथी विजयचा आगामी चित्रपट 'लिओ' 19 ऑक्टोबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. थलपथी विजयचा 'लिओ' हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता संजय दत्त दिसणार आहे. 'लिओ' चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये विजय व्यतिरिक्त त्रिशा कृष्णन, संजय दत्त, अर्जुन सर्जा, गौतम वासुदेव मेनन, मायस्किन, मॅथ्यू थॉमस, प्रिया आनंद हे कलाकार दिसणार आहे. दरम्यान आता सुपरस्टार रजनीकांत यांनी विजयला 'लिओ'साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

रजनीकांत यांनी लिओसाठी प्रार्थना केली : मिळालेल्या माहितीनुसार 'लिओ' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला पाहिजे अशी रजनीकांतची इच्छा आहे. एका मुलाखतीत रजनीकांत यांना विजयच्या 'लिओ' चित्रपटाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी म्हटलं, 'चित्रपटाला भरघोस यश मिळावे अशी माझी इच्छा आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुप्परहिट व्हावा'. 'लिओ' सध्या 19 ऑक्टोबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहे. लिओ'नंतर दिग्दर्शक लोकेश कनागराज रजनीकांतसोबत 'थलैवर 171' या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर देणार आहे. यापूर्वी अनिरुद्धनं 'जवान' आणि 'जेलर' चित्रपटाला जबरदस्त संगीत दिले आहे, त्यामुळे आता अनेकांची पहिली पसंत तो बनला आहे.

रजनीकांतचा 'थलैवर 170' : 'लिओ' चित्रपटामध्ये विजय आणि संजय दत्तचे अनेक अ‍ॅक्शन सीन पाहायला मिळणार आहे. यापूर्वी या चित्रपटाची आगाऊ बुकिंग ही यूकेमध्ये जोरदार झाली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप धमाल करेल असेल असं सध्या दिसत आहे. दरम्यान आता रजनीकांतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रजनीकांतच्या या चित्रपटाला तात्पुरते नाव 'थलैवर 170' दिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल आहेत. 'थलैवर 170'मध्ये अमिताभ बच्चन, फहाद फासिल, मंजू वॉरियर, राणा दग्गुबती, दुशारा विजयन आणि रितिका सिंग हे कलाकार असणार आहेत.

हेही वाचा :

  1. Hema Malini 75th birthday: ईशा देओलनं आई हेमा मालिनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; फोटोही केले शेअर...
  2. Saif Kareena Wedding Anniversary: करीना कपूरनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस, शेअर केला पतीसोबतचा 'हा' खास फोटो...
  3. 69th National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी अल्लू अर्जुन दिल्लीला रवाना, राजामौली आणि एमएम कीरवाणीही राजधानीत दाखल

Last Updated : Oct 16, 2023, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.