मुंबई - काश्मीर फाईल्स या प्रसिद्ध झालेले दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या द व्हॅक्सिन वॉर चित्रपटाची निर्मिती करण्यात गुंतले आहेत. निर्मितीची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची भरपूर चर्चा होत असते. या चित्रपटाच्या कलाकारामध्ये नवीन भर पडली असून अभिनेत्री रायमा सेन, नाना पाटेकर, अनुपम खेर आणि सप्तमी गौडा या कलाकारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. सोशल मीडियावर याची सध्या खूप चर्चा आहे.
चित्रपट निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून यात विविके अग्निहोत्री कोलकात्याच्या दौऱ्यावर असताना रायमा सेनला भेटताना दिसतो. बंगाली सिनेमाची प्रतिभावान अभिनेत्री रायमा सेन व्हिडिओत पाठमोरी बसलेली दिसते. विवेक तिची ओळख करुन देतो आणि म्हणतो की हिच्यासारख्या सुंदर अभिनेत्रीला हिंदी सिनेमात काम केले पाहिजे, पण ती म्हणते की मला कोणी तशी ऑफरच दिली नाही. तेव्हा आम्ही तिला व्हॅक्सिन वॉरसाठी आमंत्रण दिले आहे. यानंतर रायमा सेन कॅमेऱ्याकडे वळते आणि आपण या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगते.
-
Look, who joined the cast of #TheVaccineWar. #ATrueStory pic.twitter.com/p4zJKVAwpz
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) June 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Look, who joined the cast of #TheVaccineWar. #ATrueStory pic.twitter.com/p4zJKVAwpz
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) June 14, 2023Look, who joined the cast of #TheVaccineWar. #ATrueStory pic.twitter.com/p4zJKVAwpz
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) June 14, 2023
व्हॅक्सिन वॉर चित्रपटाबद्दलचा अधिक तपशील अद्यापही गुलदस्त्यात असून चित्रपटाचे शीर्षक त्याच्या अंतर्निहित थीम आणि एकंदर फोकसबद्दल बोलते. कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व आव्हानांचा अथकपणे सामना करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या आणि वैद्यकीय समुदायाच्या अतुलनीय समर्पणाचा सन्मान करण्याचाही या चित्रपटाचा उद्देश आहे.
विवेक रंजन अग्निहोत्री या चित्रपटाबद्दल बोलताना आधी म्हणाले होते की, जेव्हा कोविड लॉकडाऊन दरम्यान काश्मीर फाइल्स पुढे ढकलण्यात आल्या, तेव्हा मी त्यावर संशोधन सुरू केले. त्यानंतर आम्ही आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन सुरू केले ज्यांनी आमची स्वतःची लस शक्य केली. त्यांच्या संघर्षाची कथा आणि त्याग जबरदस्त होता आणि संशोधन करत असताना आम्हाला समजले की या शास्त्रज्ञांनी भारताविरुद्ध केवळ परदेशी एजन्सींनीच नव्हे तर आपल्याच लोकांविरुद्ध छेडलेले युद्ध कसे लढले. तरीही, सर्वात वेगवान, स्वस्त आणि सुरक्षित लस बनवून आम्ही महासत्तांवर विजय मिळवला. मला वाटले की ही कथा सांगायलाच हवी. जेणेकरून प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा अभिमान वाटेल.
व्हॅक्सिन वॉर 20 ऑक्टोबर 2023 रोजी दसऱ्याच्या दरम्यान 11 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. यापूर्वी 2023 च्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट रिलीज होणार होता.
हेही वाचा -
१. Kabali Producer Arrested : कबाली चित्रपटाच्या वितरक निर्मात्याला ड्रग्ज प्रकरणात अटक
३. Hrithik Roshan goes shirtless : व्हिटॅमिन धूप मिळवण्यासाठी हृतिक रोशन झाला शर्टलेस, चाहते खूश