ETV Bharat / entertainment

Raghava Lawrence shares first look : 'चंद्रमुखी २' मधील राघव लॉरेन्सचा 'वेट्टय्यान राजा' फर्स्ट लूक प्रसिद्ध - कंगना रणौत

'चंद्रमुखी २'च्या निर्मात्यांनी या चित्रपटातील राघव लॉरेन्सचा वेट्टायन राजा या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. या चित्रपटामध्ये कंगना रणौतदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल.

Raghava Lawrence
राघव लॉरेन्स
author img

By

Published : Jul 31, 2023, 2:56 PM IST

मुंबई : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता राघव लॉरेन्स सध्या त्याच्या आगामी 'चंद्रमुखी २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांचा उत्साह वाढवत, चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'चंद्रमुखी २' मधील वेट्टयानच्या भूमिकेत राघव लॉरेन्सचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. चित्रपटाचे पोस्टर आज म्हणजेच ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता रिलीज करण्यात आले आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. २००५ रोजी आलेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटाचा 'चंद्रमुखी २' सीक्वेल आहे. 'चंद्रमुखी' चित्रपटात यापूर्वी मेगास्टार रजनीकांत झळकले होते. पी वासू दिग्दर्शित, लॉरेन्स या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसोबत दिसणार आहे.

  • Back with double the swag and attitude! 😉 Witness Vettaiyan Raja's 👑 intimidating presence in @offl_Lawrence 's powerful first look from Chandramukhi-2 🗝️

    Releasing this GANESH CHATURTHI in Tamil, Hindi, Telugu, Malayalam & Kannada! 🤗#Chandramukhi2 🗝️
    🎬 #PVasu
    🌟… pic.twitter.com/nf7BHwi3x6

    — Lyca Productions (@LycaProductions) July 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राघव लॉरेन्सची दमदार शैली : चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर 'चंद्रमुखी २' चे पोस्टर शेअर करून या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. कंगना रणौत आणि राघव लॉरेन्स स्टारर हा चित्रपट गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सिनेप्रेमींमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. लायका प्रॉडक्शन आणि सुबास्करन निर्मित हा चित्रपट सप्टेंबरमध्ये तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

कंगना महत्त्वाच्या भूमिकेत : या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटाची शूट संपल्यानंतर कंगनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहले होते की, आज मी चंद्रमुखीमधील माझी भूमिका पूर्ण करत असताना, अनेक अद्भुत लोकांना निरोप देताना मला खूप वाईट वाटत आहे. मी कोणाला परत भेटेल हे खूप कठीण आहे, माझ्याकडे इतकी सुंदर टीम होती. असे तिने आपल्या सोशल मीडियावर सांगितले होते. 'चंद्रमुखी २' १९ सप्टेंबर २०२३ रोजी रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Kiara Advani Birthday : कियारा अडवाणी पती सिद्धार्थसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली परदेशी...
  2. Zinda Banda Song : 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाणे प्रदर्शित, भव्य सेटवर शाहरुख खानचा जबरा डान्स
  3. Ghoomer: 'मेलबॉर्न फिल्म फेस्टिव्हल'मध्ये होणार 'घुमर'चा प्रीमियर, मोशन पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.