ETV Bharat / entertainment

Raghav Juyal breaks silence : शहनाज गिलसोबत राघव जुयालची डेटिंग असल्याची अफवा, अभिनेता म्हणाला... - अभिनेता राघव जुयाल

किसी का भाई किसी की जान ट्रेलर लॉन्चच्या वेळी सलमान खानने शहनाजला 'मूव्ह ऑन' करण्यास सांगितल्यानंतर राघव जुयाल आणि शहनाज गिलच्या डेटिंगच्या अफवा सुरू आहेत.

राघव जुयाल आणि शहनाज गिल
राघव जुयाल आणि शहनाज गिल
author img

By

Published : Apr 18, 2023, 12:26 PM IST

मुंबई - उत्कृष्ठ डान्सर आणि अभिनेता राघव जुयाल सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. पहिल्यांदाच तो बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसोबत स्क्रीन टाइम शेअर करत आहे. या चित्रपटामध्ये बिग बॉस फेम शहनाज गिलसोबत त्याची भूमिका आहे.

शहनाझ आणि राघवच्या डेटिंग अफवा - सलमान खानने शहनाजला आयुष्यात पुढे जाण्यास सांगितल्यानंतर केबीकेजेच्या ट्रेलर लॉन्चवेळी राघव आणि शहनाज यांच्यात डेटिंगच्या अफवा पसरायला सुरुवात झाली. डेटिंगच्या अफवेने त्यांचे सुरु असलेले काम आणि आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात हस्तक्षेप सुरु केल्यानंतर राघवने अखेर आपली प्रतिक्रिया दिली. राघवने सर्व दावे फेटाळून लावले आणि सांगितले की त्याच्याकडे प्रेमासाठी वेळ नाही. तो म्हणाला, 'जो इंटरनेट की चीजें है, वो मेरे तक नहीं आ पाती,'

राघवने करियरसाठी वाहून घेतलंय - त्याला त्याच्या कामातून स्वतःच बोलायचे आहे. 'मैं फिल्म के लिए आया हूं,' राघव म्हणाला, 'आणि मला वाटते की लोकांनी मला एक अभिनेता, एक डान्सर आणि एक होस्ट म्हणून पाहावं. फक्त माझे काम बोलेल. बाकी या ज्या सर्व गोष्टी आहेत, यासाठी माझ्याकडे वेळ नाही. कामाशिवाय या गोष्टींसाठी मला सवड नाही. मी डबल शिफ्टमध्ये काम करत आहे आणि माझ्या करिअरच्या या टप्प्यावर या सगळ्यासाठी वेळ नाही.'

सलमानचा शहनाझला सिडनाझमधून बाहेर येण्याचा सल्ला - ट्रेलर लॉन्च दरम्यान, सलमानने शहनाजला पुढे जाण्याचा सल्ला दिला. शहनाझ गिलचे पूर्वी सिद्धार्थ शुक्लावर प्रेम होते. दोघे बिग बॉसमध्ये एकत्र आल्यानंतर या जोडीला सिडनाझ म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर ते दोघे डेटिंग करत असताना सिद्धार्थचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतरही लोक सिडनाझ विसरु शकले नव्हते. आता शहनाझ सिद्धार्थमधून बाहेर पडयला हवी व तिने आपले नवे आयुष्य नव्या जोडीदारासोबत सुरु केले पाहिजे अशा अर्थाने सलमानने तिला सल्ला दिला. त्यानंतर या सल्ल्याचा संदर्भ घेऊन लोकांनी ती राघवला डेट करत आहे असे पटकन गृहीत धरले. मात्र, सध्या पसरणाऱ्या अफवांवर शहनाजने काहीही बोललेले नाही. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, भूमिका चावला, जगपती बाबू आणि व्यंकटेश दग्गुबती हे कलाकार आहेत.

हेही वाचा - Akanksha Dubey Death Case : आकांक्षा दुबे मृत्यूपूर्वी केला फोन, भोजपुरी गायक समर सिंगची पोलीस कोठडीत गुपितांची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.