मुंबई - Pushpa 2 : अल्लू अर्जुनला 'पुष्पा : द राइज - पार्ट 1'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अल्लू अर्जुन हा पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू अभिनेता आहे. यापूर्वी तेलुगू चित्रपटांच्या इतिहासात एकाही अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. अल्लू अर्जुनला ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत यावेळी सामना करावा लागला होता. यासोबतच आता अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2: द रुल'कडून मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक देवीश्री प्रसाद यांनाही राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 'पुष्पा : द राइज - पार्ट 1' या चित्रपटामधील सर्व गाणी हिट ठरली होती.
'पुष्पा 2'ची रिलीज डेट : 'पुष्पा 2'चं शूटिंग सध्या जोरात सुरू आहे. रश्मिका मंदान्नानं इंस्टाग्रामच्या माध्यमातून 'पुष्पा 2'च्या सेटशी संबंधित एक फोटो शेअर केला होता. या फोटोत असं दिसतं होतं की, रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांच्यातील सीन एका मोठ्या इमारतीत शूट होत आहे. सध्या या चित्रपटातील कौटुंबिक दृश्यांचं चित्रीकरण सुरू असल्याचं समजतं. 'पुष्पा 2' मधील अनेक दृश्यांच्या काही क्लिप्स लीक झाल्या आहेत. अलीकडेच 'पुष्पा 2' चित्रपटाच्या लॉरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. दरम्यान आता 'पुष्पा 2'च्या रिलीजची तारीख समोर आली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.
रामोजी फिल्मसिटीमध्ये शूटिंग : या चित्रपटातील प्रमुख दृश्यांचं चित्रीकरण यापूर्वीच पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं शुटिंग सध्या रामोजी फिल्मसिटीमध्ये शूटिंग सुरू आहे. खरं तर, 'पुष्पा 2 हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीसच प्रदर्शित करण्याची योजना होती. मात्र चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा असल्यामुळे प्रदर्शनाबद्दल अधिक खबरदारी घेतली जातेय. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फाजील स्टारर या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमारनं केलंय. 'पुष्पा 2' हा चित्रपट माइथ्री मूवी मेकर्स निर्मित आहे. 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत नवीन रेकॉर्ड करेल, अशी अपेक्षा आतापासूनच व्यक्त केली जातेय.
हेही वाचा :