ETV Bharat / entertainment

Fahadh Faasil's first look : फहद फासिलच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा 2: द रुल'मधील जबरदस्त फर्स्ट लूक जारी - फहद फासिल

अभिनेता फहद फहद फासिल आणि अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' चित्रपटामध्ये भंवर सिंग शेखावतची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 8 ऑगस्ट रोजी फहद आपला 42 वा वाढदिवस साजरा करत असून त्यानिमित्ताने त्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.

Fahadh Faasil's first look
पुष्पा २ मधील फहद फासिल फर्स्ट लूक
author img

By

Published : Aug 8, 2023, 1:16 PM IST

Updated : Aug 8, 2023, 2:56 PM IST

मुंबई - अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २' च्या प्रत्येक अपडेटची चाहते प्रतीक्षा करत असतात. या चित्रपटातील अल्लू अर्जुनला कडक टक्कर देणारा फहद फासिलचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी लॉन्च केला आहे. फहदच्या वाढदिवसानिमित्त त्याचा फर्स्ट लूक चाहत्यांच्या भेटीस आणण्यात आला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरपूर प्रशंसा केलेला अभिनेता फहद फासिल ८ ऑगस्ट रोजी ४२ वर्षांचा झाला. निर्मात्यांनी त्याचा 'पुष्पा 2' मधील आक्रमक लूक जारी केला आहे. अल्लू अर्जुन आणि फहद फासिलची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा 2' हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

'पुष्पा 2' चित्रपटामध्ये फहद फासिल खलनायक भंवर सिंग शेखावतची मूळ भूमिका पुन्हा साकारत आहे. पोस्टरमध्ये तो खाकी जॅकेट परिधान करुन सिगारेटचा झुरका घेताना दिसत आहे. टक्कल गेटअपही ठेवला आहे.

'पुष्पा 2' या बहुप्रतिक्षित चित्रपटात रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, अजय, राव रमेश, अनसूया आणि इतर नामवंत कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुकुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या तांत्रिक टीमध्ये संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद, कॅमेरामन मिरोस्ला कुबा आणि संकलक श्रीनिवास आणि रुबेन यांचा समावेश आहे. दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुनने 'पुष्पा: द रुल'साठी आणखी एक दीर्घ काळाचे शुटिंग शेड्यूल सुरू केले आहे. हैदराबाद येथील सुप्रसिद्ध रामोजी फिल्मसिटीमध्ये तो चित्रपटाचे शुटिंग करत आहे.

'रामोजी फिल्म सिटी'मध्ये भव्य सेट उभारण्यात येणार असून यावर चित्रपटाचे महत्तवाचे सीन्स शूट केले जातील. प्रेक्षकांसमोर काहीतरी भव्यदिव्य आणण्याचा प्रयत्न यातून निर्माता करत असल्याचे चित्रपटाशी संबंधित व्यक्तीने सांगितले.

फहाद फासिलची पत्नी नाझरिया नाझिमने त्याला वाढदिवसाच्या शुभच्छा इन्स्टाग्रावर दिल्या आहेत. तिने मामुट्टीने काढलेले दोन फोटो चाहत्यांसाठी भेट दिले आहेत. अलीकडेच फहद फासिलचा 'मामन्नान' हा चित्रपट रिलीज झाला. त्यासाठी त्याने सोशल मीडियावर काहीच सक्रियता दाखवली नव्हती. त्यामुळे या जोडप्याचे चाहते काहीसे नाखूश दिसत होते. त्याची कसर नाझरियाच्या या पोस्टने भरुन काढली आहे.

हेही वाचा -

१. Jawan Movie : शाहरुख खानने 'जवान' चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना दिली रिलीजची आठवण...

२. Taali Trailer: सुष्मिता सेन स्टारर 'ताली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...

३. Kushi Trailer Date OUT: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'खुशी' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर...

Last Updated : Aug 8, 2023, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.