मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान छोट्या-छोट्या हालचालींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतो. त्याच्या नियमित ASKSRK या सत्रामुळे तो चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनला आहे. शाहरुखने शनिवारी दिल्ली अपघात पीडित अंजली सिंगच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे करत रक्कम दान केल्यामुळे तो बातम्यांच्या मथळ्यात झळकला आहे. तेव्हापासून, शाहरुख सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे कारण चाहत्यांनी त्याच्या दातृत्वाच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
-
Shuffling on my fav song #JhoomeJoPathaan #Pathaan @iamsrk @deepikapadukone @yrf #srkian #shuffledance @SRKUniverse @mrtownboy @JoySRKian_2 @SRKFC_PUNE
— Kunal more (@iamkunalmore) January 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
PROUD OF SHAH RUKH KHAN pic.twitter.com/SLp5Rt7DmY
">Shuffling on my fav song #JhoomeJoPathaan #Pathaan @iamsrk @deepikapadukone @yrf #srkian #shuffledance @SRKUniverse @mrtownboy @JoySRKian_2 @SRKFC_PUNE
— Kunal more (@iamkunalmore) January 8, 2023
PROUD OF SHAH RUKH KHAN pic.twitter.com/SLp5Rt7DmYShuffling on my fav song #JhoomeJoPathaan #Pathaan @iamsrk @deepikapadukone @yrf #srkian #shuffledance @SRKUniverse @mrtownboy @JoySRKian_2 @SRKFC_PUNE
— Kunal more (@iamkunalmore) January 8, 2023
PROUD OF SHAH RUKH KHAN pic.twitter.com/SLp5Rt7DmY
प्राऊड ऑफ शाहरुख खान ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि चाहते त्याच्या आवडत्या सुपरस्टारला त्याच्या दयाळूपणाबद्दल पाठिंबा आणि प्रेम देत आहेत. 12 डिसेंबर रोजी बेशरम रंग चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर शाहरुख आणि त्याचा आगामी चित्रपट पठाण याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु ट्विटरवरील शाहरुख खानचा अभिमानाचा ट्रेंड हे सिद्ध करतो की त्याचे राज्य अबाधित आहे. त्याचे चाहते त्याच्यावर भरभरुन प्रेम करत आहेत.
-
You are trying to get him down but hawa se thori na hilne wala hai woh #PROUDOFSHAHRUKHKHAN #sharukhkhan #pathaan #pathaantriler pic.twitter.com/mDbhUTwBLS
— Sharukh khan afg fans (@ALateefullah) January 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">You are trying to get him down but hawa se thori na hilne wala hai woh #PROUDOFSHAHRUKHKHAN #sharukhkhan #pathaan #pathaantriler pic.twitter.com/mDbhUTwBLS
— Sharukh khan afg fans (@ALateefullah) January 8, 2023You are trying to get him down but hawa se thori na hilne wala hai woh #PROUDOFSHAHRUKHKHAN #sharukhkhan #pathaan #pathaantriler pic.twitter.com/mDbhUTwBLS
— Sharukh khan afg fans (@ALateefullah) January 8, 2023
अंजलीचा वेदनेने मृत्यू - अंजली सिंह 31 डिसेंबरच्या रात्री मैत्रिण निधीसोबत घरी परत येत होती, परंतु ती घरी पोहोचू शकली नाही. कारण त्या रात्री अंजलीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. असे काहीसे घडले की, दिल्लीच्या कांजवाला रोडवर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने अंजलीच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या वेदनादायक अपघातात, कारमध्ये अडकलेल्या अंजलीला अनेक किलोमीटर रस्त्यात ओढले गेले आणि तिला जीव गमवावा लागला. या अपघातात अंजलीची मैत्रिण निधी बचावली होती, मात्र अंजली त्या गाडीखाली अडकली. अंजलीचा वेदनेने मृत्यू झाला.
शाहरुखने अंजलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली : या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलीस तपासात गुंतले असून दररोज नवनवीन सूत्रे समोर येत आहेत. आता अंजली प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी अशी आली आहे की, बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानने अंजली सिंहच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. किंग खानने त्याचे दिवंगत वडील मीर ताज मोहम्मद यांच्या नावाने मीर फाउंडेशन ही एनजीओ उघडली आहे. या स्वयंसेवी संस्थेचा उद्देश खालच्या स्तरातील गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे आहे.
-
#PROUDOFSHAHRUKHKHAN pic.twitter.com/Rd7eb1eoB6
— Karanvir Singh (@Karanvi84996364) January 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#PROUDOFSHAHRUKHKHAN pic.twitter.com/Rd7eb1eoB6
— Karanvir Singh (@Karanvi84996364) January 8, 2023#PROUDOFSHAHRUKHKHAN pic.twitter.com/Rd7eb1eoB6
— Karanvir Singh (@Karanvi84996364) January 8, 2023
शाहरुख खानच्या दातृत्वामुळे अंजलीच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी मोठी मदत मिळाली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांनी प्राऊड ऑफ शाहरुख खान हा ट्रेंड सेट केला आणि त्याला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. झूमे जो पठानवर डान्स व्हिडिओ बनवूनही काहींनी आपले प्रेम व्यक्त केले आहे. असाच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो म्हणजे नवोदित कोरिओग्राफर आणि शाहरुख फॅन कुणाल मोरेचा. व्हिडीओमध्ये कुणाल आणि काही डान्सर्स पुण्याच्या रस्त्यावर झूमे जो पठाण गाताना दिसत आहेत.
शाहरुख खान चार वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर सिद्धार्थ आनंदच्या पठाण चित्रपटातून पुनरागम करण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला पठाण 25 जानेवारी रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुखसोबत राजकुमार हिरानीचा डंकी आणि अॅटलीचा जवान हा चित्रपटही येत आहे.