मुंबई - प्रियांका चोप्रा सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. प्रियांका चोप्रा या वर्षी जानेवारीमध्ये सरोगसीद्वारे एका मुलीची आई बनली आणि तेव्हापासून मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबतचे फोटो शेअर करत आहे. मात्र, आतापर्यंत अभिनेत्रीने आपली मुलगी मालतीचा चेहरा पूर्णपणे दाखवलेला नाही. अभिनेत्रीने रविवारी पुन्हा एकदा तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्येही प्रियांकाने मुलगी मालतीचा चेहरा लपवला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिले की, 'प्रेमासारखे दुसरे काही नाही'. या फोटोत प्रियांकाने हिरव्या रंगाचा शॉर्ट्सवर पांढरा शर्ट घातला आहे आणि तिची मुलगी तिच्या मांडीवर बसलेली आहे. हा एक सेल्फी फोटो आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दुसऱ्या फोटोत मालतीचे पाय प्रियांका चोप्राच्या तोंडावर आहेत आणि ती हसत आहे. मालतीचे पाय खूप सुंदर दिसत आहेत. आता चाहते आणि सेलिब्रिटी या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. प्रियांकाच्या या फोटोंच्या कॅप्शनवर अभिनेत्री दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे.
प्रीती झिंटाने दोन हार्ट इमोजी शेअर केले आहेत. प्रियांकाची बहीण परिणीती चोप्राने लिहिले आहे की, मला मालतीची आठवण येते. त्याचबरोबर अभिनेत्री अनुष्का शर्मानेही फोटोंवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. करीना कपूर खाननेही प्रियंका आणि तिच्या लेकीचे कौतुक केले आहे.
2018 मध्ये प्रियंका चोप्राने राजस्थानमध्ये परदेशी बॉयफ्रेंड निक जोनाससोबत शाही विवाहसोहळा पार पाडला होता, ज्यामध्ये मुकेश अंबानीच्या कुटुंबानेही हजेरी लावली होती. या लग्नात देश-विदेशातील बड्या सेलिब्रिटींनी उपस्थिती दाखवली होती.
लग्नाच्या चार वर्षानंतर प्रियांका चोप्राने सरोगसीद्वारे मुलगी मालतीला जन्म दिला. वर्क फ्रंटवर प्रियांका चोप्राने सिटाडेल या मालिकेचे शूटिंग पूर्ण केले आहे.