मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर तिची उपस्थिती तितकीच नियमीत आहे. प्रियांका सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिच्या क्षणाचे अपडेट्स देत असते. ती तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त असली तरी चाहत्यांशी संपर्क साधण्यास विसरत नाही. आता प्रियंका चोप्राने तिचे दिवंगत वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीला ओळखणे कठीण जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रियांका चोप्राने 10 तासात तीन पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये ती तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये तिने तिचे फोटो शेअर केले आहेत आणि तिसऱ्या पोस्टमध्ये तिने एक इंग्रजी म्हण शेअर केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रियांका चोप्राच्या बालपणीच्या फोटोबद्दल बोलणार आहोत. या फोटोत प्रियांका चोप्रा तिचे वडील अशोक यांच्या काखेत बसली आहे. प्रियांकाच्या वडिलांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता तर प्रियांकाने लाल-पांढऱ्या कॉन्ट्रास्टमध्ये फ्रॉक घातला आहे.
हा फोटो शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिले आहे की, 'पप्पाची छोटी मुलगी'. प्रियंका तिच्या वडिलांची खूपच लाडकी असावी यात शंका नाही. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर 10 जून 2013 रोजी अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले होते.
हेही वाचा - हृतिक रोशन आणि मौनी रॉयच्या एकत्र सेल्फीची बॉलिवूडमध्ये चर्चा