ETV Bharat / entertainment

प्रियंका चोप्राने शेअर केला २२ वर्षांपूर्वीचा बिकीनीतील फोटो - देसी गर्ल प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राने बिकिनीमधला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत 'देसी गर्ल' 18 वर्षांची असून या फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्रिटीही कमेंट्स करीत आहेत.

प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रा
author img

By

Published : Jun 10, 2022, 1:10 PM IST

मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमी दिसत असली तरीही सतत चर्चेत असते. कधी ती तिच्या आउटफिट्समुळे तर कधी तिच्या परदेशी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत राहते. सध्या ती बल्गारी कंपनीच्या दागिन्यांची जाहिरात करताना दिसत आहे. अलीकडेच या कार्यक्रमातून तिचा गॉर्जियस आणि बोल्ड लूक समोर आला. आता प्रियांका चोप्रा प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण म्हणजे तिचा 22 वर्षांपूर्वीचे बिकिनीमधले फोटोशूट.

प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी बिकिनीमधील तिचे 22 वर्षांपूर्वीचे बीच फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमधील प्रियांका चोप्रा तेव्हा १८ वर्षांची होती. हे फोटोशूट २००० मधील नोव्हेंबर महिन्यातील आहे जेव्हा ती १८ वर्षांची होती.

या फोटोतील प्रियांका चोप्राला ओळखणे कठीण आहे. गेल्या 22 वर्षात प्रियांका चोप्राच्या रुपात खूप बदल झाला आहे. आता चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी प्रियंका चोप्राच्या या फोटोला पसंती देत ​​आहेत.

रणवीर सिंगने प्रियंका चोप्राच्या फोटोवर लिहिले, 'ब्रुह'. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, का माहीत नाही, पण यात तू अभिनेत्री भाग्यश्रीसारखी दिसत आहेस. समोर आलेल्या फोटोत प्रियांका चोप्रा बिकिनीत असून हातात काळ्या बांगड्या घातल्या आहेत. प्रियांकाने आपले केस खुले ठेवले आहेत आणि कपाळावर बिंदीही लावली आहे.

या फोटोत १८ वर्षीय प्रियंका चोप्राच्या चेहऱ्यावर निरागसता स्पष्टपणे दिसत आहे. ती बीचवर झाडाच्या साहाय्याने पोज देताना दिसत आहे. प्रियांका चोप्राचा लूक काळानुसार बदलला आहे. प्रियांकाने 2000 साली 'द हीरो' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले. या वर्षी जानेवारीमध्ये सरोगसीद्वारे हे जोडपे एका मुलीचे पालक झाले. मालती मेरी जोनास असे मुलीचे नाव आहे.

हेही वाचा - पूजा हेगडेने इंडिगोच्या कर्मचाऱ्याला घेतले फैलावर, एअरलाइनने मागितली माफी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.