मुंबई : ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने तिच्या सोशल मीडिया हँडलवर गायक पती निक जोनासच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. निकने त्याच्या 'द गुड हाफ' या चित्रपटाबद्दल शेअर केले आहे, जो ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. या पोस्टमध्ये निक हा चित्रपटातील इतर कलाकारांसोबत दिसत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना, निकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या नवीन चित्रपट 'द गुड हाफ' चा वर्ल्ड प्रीमियर ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये 8 जून रोजी स्क्रीनिंग होईल. या अविश्वसनीय कलाकारांसोबत येण्यास उत्सुक आहे! त्यानंतर निकने त्याच्या चित्रपटातील कलाकारांना पोस्टमध्ये टॅग केली आहे. प्रियांकाने पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिले, 'गो'(चला) त्यानंतर तिने पोस्टवर फायर आणि क्लॅप इमोजी दिले.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया : निकच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी फार कमेंट केली आहे. चाहत्यांनी त्यांच्या चित्रपटासाठी उत्साह दाखलिला आहे. एका चाहत्याने लिहले, 'छान आहे, निक. हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. तर दुसर्या एका चाहत्याने लिहले, 'मुंबई नाईट्स पॉपकॉर्नसह हा चित्रपट पाहण्याची वाट पाहत आहे.' तर आणखी एकाने लिहिले, 'हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे, निकचा तुझा अभिमान आहे.' तसेच चाहत्यांनी कमेंट विभागात लाल हार्ट इमोजींचा वर्षाव केला आहे. अशा अनेक कमेंट या पोस्टवर आल्या आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ट्रिबेका फेस्टिव्हल : रॉबर्ट श्वार्टझमनच्या ट्रिबेका फेस्टिव्हल प्रीमियर हा 8 जून ,10 जून आणि 12 जून रोजी होणार आहे. निक व्यतिरिक्त, या चित्रपटात ब्रिटनी स्नो, अलेक्झांड्रा शिप, डेव्हिड आर्क्वेट, मॅट वॉल्श आणि एलिझाबेथ शू हे देखील असणार आहेत. निकने अलीकडेच लोकप्रिय रॅपर किंगसोबत 'मन मेरी जान' या गाण्याच्या इंग्रजी रिमेकसाठी सहकार्य केले. तसेच त्याने प्रियांकाच्या ‘लव्ह अगेन’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका साकारली आहे. 1 डिसेंबर 2018 रोजी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाला होता. तसेच त्यानंतर प्रियंका आणि निकला सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरी जानेवारी 2022मध्ये झाली. अनेकदा दोघेही आपल्या मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेवून जात असतात.
हेही वाचा :