ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra got angry : दिल्लीत सेल्फीसाठी खूप जवळ येणाऱ्यावर प्रियांका चोप्रा भडकली, पाहा व्हिडिओ

प्रियांका चोप्रा शनिवारी सकाळी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाली. दिल्ली विमानतळावरील प्रियांकाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे ज्यात तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तिच्या सुरक्षेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रियांका रागावलेली दिसत आहे.

Priyanka Chopra got angry
खूप जवळ येणाऱ्यावर प्रियांका चोप्रा भडकली
author img

By

Published : May 13, 2023, 2:37 PM IST

मुंबई - ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा शनिवारी सकाळी तिची चुलत बहिण आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा यांच्या साखरपुडा समारंभात उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत दाखल झाली. हा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडणार आहे. दिल्ली विमानतळावरील ग्लोबल आयकॉन प्रियांकाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

प्रियांका भोवतीच्या सुरक्षा रक्षकांना भेदून सेल्फी घेण्याचा प्रयत्न - सोशल मीडियावर एका पापाराझीने पोस्ट केलेल्या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये, प्रियांका चोप्रासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात दोन पुरुषांनी सुरक्षेला धक्का दिल्याने प्रियंका चिडलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्रियांकाच्या सुरक्षा रक्षकाला मागे ढकलून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी प्रियांका विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. या प्रकारामुळे प्रियांका नाराज दिसत होती. मात्र, जेव्हा दुसरा माणूस संधीचा फायदा घेत सेल्फी घेण्यासाठी तिच्याकडे गेला तेव्हा ती लगेचच सावध झाली. त्यानंतर तिचे सुरक्षा पथक लगेचच कारवाईला आले.

प्रियांकाचा दिल्ली दौरा - प्रियांका तिची चुलत बहीण परिणीतीच्या बहुप्रतीक्षित एंगेजमेंट समारंभात उपस्थिती दर्शवण्यासाठी दिल्लीला आली आहे. तिचा जोडीदार निक जोनास या वेळी तिच्यासोबत आला नाही कारण तो इतर जोनास ब्रदर्ससोबत त्याच्या नवीन अल्बमच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. असे समजते की परिणीतीची एंगेजमेंट आटोपल्यानंतर फार काळ प्रियांका भारतात थांबणार नाही. एका बाजूला पती निक जोनासचे शेड्यूल सलग कामाचे असून प्रियांकाकडेही भरपूर काम आहे. गेल्या काही दिवसापूर्वी नीता अंबानी इव्हेन्टमध्ये हे जोडपे सामील होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यानंतर ती जगातील अनेक देशामध्ये सिटाडेलच्या प्रमोशनसाठी फिरत होती.

यादरम्यान, परिणीती आणि राघव कनॉट प्लेसमधील कपूरथला हाऊसमध्ये पारंपारिक समारंभात अंगठीची दोवाण घेवाण करतील. मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्याने त्यांच्या एंगेजमेंट सोहळ्यासाठी मॅचिंग पोशाख घालण्याचा निर्णय घेतला आहे. राघवने त्याचे मामा, फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी बनवलेला ड्रेस निवडला आहे. तर परिणीतीने मनीष मल्होत्राचा क्लासी पारंपारिक पोशाख घालायचे ठरवले आहे.

हेही वाचा - Urvashi Rautela Loses Cool : अक्षर पटेलला चिडवणाऱ्यावर चुकीचे आडनाव घेतल्याने भडकली उर्वशी रौतेला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.