ETV Bharat / entertainment

Jaahnavi Kandula Death: जाह्नवी कंदुलाच्या मृत्यूवर प्रियांका चोप्रानी दिली प्रतिक्रिया.... - जान्हवी कंदुलाचा मृत्यू

Jaahnavi Kandula's Death: अमेरिकेतील सिएटल येथे जाह्नवी कंदुला या विद्यार्थिनीचा पोलिसांच्या वाहनानं धडक दिल्यानं मृत्यू झाला. यावर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रानं प्रतिक्रिया दिली आहे.

Jaahnavi Kandula's Death
जाह्नवी कंदुलाचा मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 9:30 AM IST

मुंबई - Jaahnavi Kandula Death : भारतीय विद्यार्थिनी जाह्नवी कंदुलाचा 23 जानेवारी 2023 रोजी सिएटल पोलीस विभागाच्या पेट्रोलिंग कारनं धडक दिल्यानं मृत्यू झाला होता. जाह्नवीच्या मृत्यूच्या नऊ महिन्यांनंतर एक कॅमेरा रेकॉर्डिंग समोर आली आहे. ज्यामध्ये सिएटल पोलीस विभागाचे दोन अधिकारी जाह्नवी कंदुलाच्या मृत्यूची खिल्ली उडवताना दिसत आहेत. आता या रेकॉर्डिंगमुळं लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर याप्रकरणी भारतीय सेलिब्रिटी यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. अलीकडेच फरहान अख्तरनं जाह्नवीसोबत घडलेल्या वेदनादायक घटनेबाबत एक पोस्ट शेअर केली होती. दरम्यान आता प्रियांका चोप्रानं याप्रकरणी आणली प्रतिक्रिया दिली आहे.

Jaahnavi Kandula's Death
जाह्नवी कंदुलाचा मृत्यू

प्रियांका चोप्रानं शेअर केली पोस्ट : प्रियांका चोप्रानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहलं '9 महिन्यांपूर्वी घडलेली अशी दुःखद घटना आता समोर येत आहे हे जाणून खूप भयानक वाटलं आहे'. 'जीवन हे जीवन आहे, त्याची किंमत कोणीही लावू शकत नाही.' असं तिनं पोस्टमध्ये लिहलं आहे. जाह्नवी आंध्र प्रदेशातील कंदुला येथील रहिवासी आहे. ती साउथ लेक युनियनमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून पदव्युत्तर पदवी घेत होती आणि या वर्षी डिसेंबरमध्ये ती पदवीधर होणार होती.

सिएटल पोलीस विभागानं जारी केला व्हिडिओ : व्हिडिओमध्ये जाह्नवीच्या अपघातानंतर सिएटल पोलीस विभागानं सोमवारी जारी केलेल्या बॉडीकॅम फुटेजमध्ये अधिकारी डॅनियल ऑर्डर हसताना आणि जीवघेण्या अपघाताबद्दल बोलत असल्याचं दाखवलं जात आहे. हे वाहन केविन डेव्ह नावाचा अधिकारी चालवत होता. जाह्नवीच्या मृत्यूबद्दल अमेरिकन खासदार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनानं या घटनेची त्वरीत चौकशी करण्यास सांगितले आहे. जाह्नवीच्या या वेदनादायक मृत्यूनंतरही तिच्या विद्यापीठानं जाह्नवीला मरणोत्तर पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलपती केनेथ डब्ल्यू हेंडरसन यांनी ही घोषणा केली आहे.

'जाह्नवीच्या मृत्यूनंतर दिली जाणार पदवी : जाह्नवी दिली या विद्यापीठानं आपल्या फेसबुक पेजवर म्हटले आहे की, ' जाह्नवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला ही पदवी देण्याची विद्यापीठाची योजना आहे.' काही दिवसांपूर्वी अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरनेही जाह्नवीसाठी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती.जाह्नवी कंदुला मृत्यू अमेरिकी पोलीस कार की चपेटमध्ये येणारी भारतीय स्टूडेंट की वेदना होत आहेत.

हेही वाचा :

  1. Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
  2. SIIMA 2023 full winners list: दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार झाला दुबईत संपन्न...
  3. Jawan Box Office Collection Day ११ : शाहरुख खान स्टारर 'जवान' लवकरच बॉक्स ऑफिसवर 500 कोटीचा टप्पा ओलांडणार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.