ETV Bharat / entertainment

Malti Maries Bedtime Stories : प्रियंका चोप्राने मुलगी मालती मेरीच्या बेडटाइम स्टोरीजची दाखवली झलक - प्रियंका आणि निक

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची एक झलक शेअर केली आहे. अंथरुणात लेकीला गोष्टी सांगून झोपवल्यानंतरचा फोटो तिने शेअर केला आहे. प्रियंकाने या पोस्टला बेडटाइम स्टोरीज असे लिहित हार्ट इमोजीसह शेअर केले आहे.

मालती मेरीच्या बेडटाइम स्टोरीजची  झलक
मालती मेरीच्या बेडटाइम स्टोरीजची झलक
author img

By

Published : Mar 27, 2023, 3:12 PM IST

मुंबई - प्रियांका चोप्राने सोमवारी पहाटे तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास पांढऱ्या बेडशीटने झाकलेल्या लहान पलंगावर झोपलेली एक झलक शेअर केली. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या मुलीचा चेहरा खाली आणि कॅमेऱ्यापासून दूर ठेवून तिच्या पोटावर पडलेला फोटो शेअर केला. फोटोमध्ये, लहान मेरी क्रीम रंगाच्या शालमध्ये गुंडाळलेले आणि निळे कपडे घातलेली दिसत आहे.

हा फोटो शेअर करताना प्रियंका चोप्राने बेडटाइम स्टोरीज असे लिहित हार्ट इमोजीसह शेअर केले आहे. दरम्यान, प्रियांकाचा पती निक जोनासनेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. गायकाने त्याचे पांढरे स्नीकर्स आणि मालतीचे मॅचिंग शूज कार्पेट केलेल्या जमिनीवरील फोटो शेअर केले. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, 'डॅडी एक्स डॉटर.'

निक जोनासची पोस्ट
निक जोनासची पोस्ट

मालती मेरीचा जन्म - प्रियंका आणि निक यांनी गेल्या वर्षी सरोगसीद्वारे पालक होण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा मालती मेरी घरी दाखल झाली तेव्हाचा आनंद जोनास परिवाराने साजरा केला होता. तोव्हा पासून आतापर्यंत त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा शक्य तितका मीडियाच्या समोर आणलेला नाही. अनेक वेळा दोघेही मालती मेरीसोबतचे फोटो पोस्ट करतात, मात्र तिचा चेहरा कॅमेऱ्यात दिसणार नाहीत याची काळजी घेतात.

निक जोनाससोबतचा प्रियंकाचा व्हिडिओ - शनिवारी रात्री प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक छोटी क्लिप शेअर केली ज्यामध्ये ती स्वतः आणि निक एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र बसलेले दिसत आहेत, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, जेव्हा आई आणि वडील शनिवारची रात्र साजरी करण्याचा प्रयत्न करतात. पार्श्वभूमीत मोठ्या आवाजात संगीत वाजत असताना त्यांनी ते जेवताना आणि मजा घेत असतानाचा व्हिडिओ तिने टाकला. व्हिडिओच्या शेवटी निक संगीतावर डान्स करत असताना प्रियांका हसताना दिसत आहे.

व्यावसायिक आघाडीवर, प्रियंका द रुसो ब्रदर्सच्या अ‍ॅक्शन-स्पाय थ्रिलर सिरीज सिटाडेलचे शीर्षक करताना दिसणार आहे, जी 28 एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर दोन अ‍ॅक्शन-पॅक भागांसह प्रीमियर होईल. त्यानंतर, 26 मे पर्यंत दर शुक्रवारी एक नवीन भाग प्रदर्शित केला जाईल. सिटाडेल इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड यासह विविध भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

हेही वाचा - Ram Charan birthday : राम चरणच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम तीन सर्वोत्तम भूमिका कोणत्या? टाका एक नजर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.