मुंबई - मल्याळम अभिनेता आणि माजी खासदार इनोसंट वारीद थेकेथला यांचे रविवारी कोची येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. कॅन्सरवर मात करणाऱ्या इनोसंट यांची प्रकृती काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यांना काही दिवसांपासून श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. त्यानंतर ३ मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेता इनोसंटच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर, अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर दिवंगत अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पृथ्वीराज सुकुमारन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर इनोसंट वारीद थेकेथला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, 'सिनेमाच्या इतिहासातील एका प्रतिष्ठित अध्यायाचा शेवट. इनोसंट यांना शांती लाभो.'
-
End of an iconic chapter in cinema history! Rest in peace Legend! 🙏💔#Innocent pic.twitter.com/NkPGlnSnxB
— Prithviraj Sukumaran (@PrithviOfficial) March 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">End of an iconic chapter in cinema history! Rest in peace Legend! 🙏💔#Innocent pic.twitter.com/NkPGlnSnxB
— Prithviraj Sukumaran (@PrithviOfficial) March 26, 2023End of an iconic chapter in cinema history! Rest in peace Legend! 🙏💔#Innocent pic.twitter.com/NkPGlnSnxB
— Prithviraj Sukumaran (@PrithviOfficial) March 26, 2023
दुल्कर सलमान भावूक झाला - अभिनेता दुल्कर सलमानने इंस्टाग्रामवर दिवंगत अभिनेता इनोसंटसोबतची स्वतःची काही छायाचित्रे शेअर केली आणि भावनिक नोटसह लिहिले, 'आम्ही आमच्या नक्षत्राचा सर्वात तेजस्वी तारा गमावला आहे. आम्हाला रडवेपर्यंत तुम्ही आम्हाला हसवले. आमच्या आतून दुखापत होईपर्यंत तुम्ही आम्हाला रडवले. तुम्ही सर्वात सक्षम अभिनेता होतात. तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग होतात. तुम्हाला स्क्रीनवर पाहणाऱ्या प्रत्येकासाठी तुम्ही आपले होतात. तुम्हाला जवळून ओळखणे हा बहुमान आहे. तुम्ही मला माझ्या वडिलांच्या भावासारखे होतात. तुम्ही माझ्या बालपणापासून होतात आणि मी तुमच्याबरोबर अभिनय करायला शिकत मोठा झालो आहे. तुम्ही आम्हाला तेव्हाच्या आणि आताच्या कथांची ओळख करून दिली. लोकांना तुम्ही नेहमी एकत्र ठेवले. त्यांना नेहमी मदत केलीत. माझं तुमच्यावर प्रेम आहे इनोसंट काका. शांततेत विश्रांती घ्या.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'इनोसंट साहब, तुम्ही कायम आमच्या हृदयात राहाल' - अभिनेता-गायक इंद्रजीतनेही इंस्टाग्रामवर इनोसंट यांची आठवण करून एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे, 'लिजेंड इनोसंट, आता ती फक्त आठवण आहे. असा माणूस मी याआधी पाहिला नव्हता. मला माहित नाही की आपणासारखे असे कोणीतरी पुन्हा भेटू शकेल की नाही. त्या दिवशी जेव्हा इनोसंट साहब आणि अॅलिस मॅम यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हा त्यांनी एकत्र लढा दिला आणि शिवाय 'कॅन्सर वॉर्डमध्ये हास्य' हा किताब देणारा माणूस आज आपल्याला सोडून जात आहे. इथे चित्रपटाबद्दल काही सांगायची गरज नाही. डान्स, गाणे, कॉमेडी, इमोशन, खलनायक या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आमच्या सामान्य पिढीसाठी ते शुद्ध सोने होते. मी म्हणेन की तो एक वेगळा माणूस होता., असे म्हणत त्यांनी इनोसंट यांच्यासाठी नेट लिहिली आहे.
रुग्णालयाचे निवेदन - कोची येथील व्हीपीएस लेकशोर रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'रविवारी रात्री 10.30 वाजता इनोसंट यांचा मृत्यू झाला. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचा मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी त्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, पण 2015 मध्ये त्याने कॅन्सरला पराभूत केल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले. लाफ्टर इन द कॅन्सर वॉर्डमध्ये, इनोसंट यांनी कॅन्सरशी त्यांच्या लढाईबद्दल लिहिले आहे.
1948 मध्ये इरिंजलकुडा येथे जन्मलेल्या इनोसंटने 1972 मध्ये प्रेम नझीर आणि जयभारती स्टारर 'नृत्यशाला' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. इनोसंट यांनी पृथ्वीराज सुकुमारन यांच्या कडुवा (२०२२) मध्ये अखेरची भूमिका केली. गेली पाच दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत मल्याळममध्ये ७०० हून अधिक चित्रपट इनोसंट यांनी केले आहेत.
हेही वाचा - Ram Charan Birthday : राम चरणच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम तीन सर्वोत्तम भूमिका कोणत्या? टाका एक नजर!