हैदराबाद actress Dr. Priya dies : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री डॉ. प्रिया हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. 'करुथमुथु' सारख्या शोमध्ये दिसलेल्या या मल्याळी अभिनेत्रीनं एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला तेव्हा ती आठ महिन्यांची गर्भवती होती. दोन दिवसापूर्वी अभिनेत्री रेंजूषा मेनन या मल्याळी अभिनेत्रीनं आत्महत्या करुन मृत्यूला स्वीकारलं होतं. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री डॉ. प्रियाच्या निधनानं फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जातेय.
मल्याळी टीव्ही अभिनेत्री डॉ. प्रियाच्या निधनाची बातमी अभिनेता किशोर सत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिचं नवजात बाळ रुग्णालयातील आयसीयूमध्ये असल्याचंही पोस्टमध्ये लिहिलंय. किशोर सत्यानं अभिनेत्री प्रियाचा फोटो फेसबुकवर शेअर केला आणि एक भावनिक नोट लिहिली आणि म्हटलं की, 'मल्याळम टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आणखी एक अनपेक्षित धक्कादायक मृत्यू झाला आहे. डॉ. प्रिया यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती 8 महिन्यांची गर्भवती होती. मूल आयसीयूमध्ये आहे. तिला इतर कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. काल रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली असताना तिलाअचानक हृदयविकाराचा झटका आला.
फेसबुक पोस्टमध्ये किशोर सत्यानं लिहिलंय की, 'दु:खी असलेली प्रियाची आई तिच्या एकुलत्या एक मुलीचा मृत्यू स्वीकारण्यास तयार नाही. ६ महिन्यांनी नन्ना कुठेही न जाता प्रियाकडे राहिल्या. काल रात्री हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे काही दिसलं ते पाहून मला वाईट वाटलं. त्यांना सांत्वन देण्यासाठी तुम्ही काय बोलू शकता? विश्वास ठेवणाऱ्या प्रामाणिक मनांवर देव ही क्रूरता का दाखवतो? माझ्या मनात प्रश्न पुन्हा-पुन्हा घुमत होते. रेंजुषाच्या मृत्यूचा धक्का कमी होण्याआधी आणखी एक गोष्ट घडली. अवघ्या ३५ वर्षांची व्यक्ती जेव्हा हे जग सोडून जाते तेव्हा मन भरुन येतं, शब्द सुचत नाहीत. या धक्क्यातून प्रियाच्या नवऱ्याला आणि आईला कसे बाहेर काढायचे? माहीत नाही... देव त्यांना बळ देवो.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अभिनेत्रीने अलीकडेच रुग्णालयात नियमित गर्भधारणा तपासणी केली होती. त्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. डॉक्टरांनी नवजात बाळाला आयसीयूमध्ये ठेवलं असून सध्या ते डॉक्टरांच्या निरिक्षणात आहे.