ETV Bharat / entertainment

मुंबई पोलिसांनी 'अपमानित' केल्याचा प्रतीक गांधीने सांगितला अनुभव

प्रतीक गांधी यांनी रविवारी रात्री मुंबई पोलिसांसोबतच्या 'अपमानास्पद' अनुभवाबद्दल सोशल मीडियावर भाष्य केले आहे. 'व्हीआयपी' मुव्हमेंटमुळे त्याची कार ट्रॅफिकमध्ये अडकल्याने तो चालायला लागला तेव्हा प्रतीक चित्रीकरणासाठी जात होता, परंतु पोलिसांनी त्याला पकडले आणि कोणतीही चर्चा न करता त्याला गोदामात ढकलले.

प्रतीक गांधी
प्रतीक गांधी
author img

By

Published : Apr 25, 2022, 12:12 PM IST

Updated : Apr 25, 2022, 7:19 PM IST

मुंबई - अभिनेता प्रतीक गांधी याने सोशल मीडियावर रविवारी रात्री मुंबई पोलिसांसोबत आलेला 'अपमानास्पद' अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की ट्रॅफिक जॅममुळे तो शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चालत जाऊ लागला परंतु मुंबई पोलिसांनी त्याला पकडले व त्याच्याशी कोणतीही चर्चा न करता त्याला एका गोदामात ढकलले.

  • Mumbai WEH is jammed coz of “VIP” movement, I started walking on the roads to reach the shoot location and Police caught me by shoulder and almost pushed me in some random marble warehouse to wait till without any discussion. #humiliated

    — Pratik Gandhi (@pratikg80) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्कॅम 1992 स्टार प्रतीक गांधीने काल रात्री एक कटू अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. शुटिंगसाठी जात असताना 'व्हीआयपी' मुव्हमेंटमुळे त्याची कार ट्रॅफिकमध्ये अडकल्याने तो चलत जात होता. याबद्दल त्याने ट्विटरवर लिहिलंय, ''मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस वे व्हिआयपी मुव्हमेंटमुळे जाम झाला होता, मी शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांवरुन चालू लागलो आणि पोलिसांनी मला खांद्याला धरुन पकडले आणि कोणतीही चर्चा न करता वाट पाहण्यासाठी मला जवळच्या एका संगमरवरी गोदामात ढकलले. यामुळे अपमानित झाल्याचा हॅशटॅग त्याने वापरला आहे."

  • Due to VIP movement Traffic may be slow on Western Express Highway at Santacruz towards Dharavi, Matunga between 3-9 PM on dt 24-04-2022. Mumbaikars are requested to avoid using this route and use alternative routes. #MTPTrafficUpdate

    — Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) April 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रतीकच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना, नेटिझन्सनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात उपस्थिती आले असल्याचे सांगितले. एका युरने लिहिले, "पंतप्रधान आले आहेत," प्रतीक गांधी याला पंतप्रधानांच्या भेटीची माहिती नव्हती, त्याने उत्तर दिले, "अरेरे .मला माहित नव्हते." ट्रॅफिकमुळे चिडलेल्या दुसर्‍या युजरने लिहिले, "मग पंतप्रधान इथे असतील तर काय? आम्ही कामावर जायचे नाही का? त्यांनी जनतेला थोडी सूचना दिली असती तरी ही परिस्थिती टाळता आली असती."

दरम्यान मुंबई पोलिसांनी याबाबत वाहुतूक अपडेटमध्ये याची कल्पना दिली होती. मुंबई पोलिसांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, ''VIP मुव्हमेंटमुळे दिनांक 24-04-2022 रोजी दुपारी 3 ते 9 दरम्यान धारावी, माटुंगाच्या दिशेने सांताक्रूझ येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक मंद असू शकते. मुंबईकरांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.''

वर्क फ्रंटवर, प्रतीक गांधाी अखेरचा तिग्मांशु धुलियाच्या ''द ग्रेट इंडियन मर्डर''मध्ये दिसला होता. त्याच्याकडे तापसी पन्नूसोबत ''वो लड़की है कहा'' हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. प्रतीकने विद्या बालन, इलियाना डिक्रूझ आणि भारतीय-अमेरिकन सनसनाटी सेंधिल राममूर्ती यांच्यासोबत अद्याप शीर्षक नसलेल्या रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. ''फुले'' नावाच्या बायोपिकमध्ये हा अभिनेता समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा - ‘शेर शिवराज' चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर झळकले 'हाऊस फुल्ल'चे बोर्ड!

Last Updated : Apr 25, 2022, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.