ETV Bharat / entertainment

Prabhas wax statue removed : बाहुबली फेम प्रभासचा पुतळा हटवणार, म्हैसूर संग्रहालयाने का घेतला निर्णय? - निर्माते शोबू यारलागड्डा

Prabhas wax statue removed बाहुबली चित्रपटातील प्रभासची भूमिका असलेला मेणाचा पुतळा म्हैसूर येथील संग्रहालयात उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा योग्य झाला नसल्याचा संताप निर्माता शोबू यरलागड्डा यांनी व्यक्त केला होता. अखेर हा पुतळा हटवण्याचा निर्णय संग्रहालयाच्या वतीने घेण्यात आलाय.

Prabhas wax statue removed
बाहुबली फेम प्रभासचा पुतळा हटवणार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 7:40 PM IST

हैदराबाद - Prabhas wax statue removed एसएस राजामौली यांच्या बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटातील भूमिकेनं संपूर्ण भारत वासियांना वेड लावलं. प्रभासच्या या चित्रपटातील व्यक्तीरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली होती. बाहुबलीतील प्रभासच्या या प्रतिष्ठित भूमिकेतील सुपरस्टार प्रभासच्या मेणाच्या पुतळ्याचं बुधवारी कर्नाटकातील म्हैसूर येथील चामुंडेश्वरी सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये लॉन्चिंग करण्यात आलं. परंतु, बाहुबलीच्या निर्मात्यांच्या पसंतीस हा पुतळा काही पडला नाही. बाहुबलीचे निर्माता शोबू यारलागड्डा या पुतळ्याच्या प्रतिमेवर खूश नाहीत आणि त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय.

  • This not an officially licensed work and was done without our permission or knowledge. We will be taking immediate steps to get this removed. https://t.co/1SDRXdgdpi

    — Shobu Yarlagadda (@Shobu_) September 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निर्माता शोबू यारलागड्डा यांनी ट्विट केलं आहे की बाहुबलीच्या वेशातील प्रभासचा हा पुतळा स्थापित करण्यापूर्वी संग्रहालयाने त्यांची मंजुरी मागितली नव्हती. या प्रकरणी निर्मात्याने कडक ताशेरेही ओढले आहेत. X वर मत व्यक्त करताना ( पूर्वीचे ट्विटर) निर्मात्याने संग्रहालयाच्या टीमला खडे बोल सुनावले आणि लिहिलं, 'हे अधिकृतपणे आणि आमच्या परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय केलेलं काम आहे. आम्ही हा पुतळा काढून टाकण्यासाठी त्वरित पावले उचलणार आहोत.'

निर्मात्याच्या प्रतिक्रियेला उत्तर देत संग्रहालयाच्या टीमने प्रभासचा मेणाचा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतलाय. एका वेबलॉईडने दिलेल्या माहितीनुसार संग्रहालयाच्या मालकानं खुलासा केलाय की, 'बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्याने पुतळ्याबद्दल संताप व्यक्त केला. आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नसल्यामुळे आम्ही पुतळा हटवणार आहोत.'

चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या गाजलेल्या 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन', या दोन्ही भागांनी जगभरातील प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळवली होती. जगभरात 1000 कोटी रुपयांचा गल्ला पार करणारा हा देशातील पहिला चित्रपट ठरला होता. प्रभास व्यतिरिक्त, बाहुबलीचित्रपटाच्या दोन्ही भागामध्ये राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णन, सत्यराज आणि नस्सर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा -

1. Yash Chopras Birth Anniversary: यश चोप्रांमुळे 'बिग बी', 'किंग खान' बनले रोमँटिक हिरो

2. Parineeti Wrote A Special Thank You Note: परिणीती चोप्रानं मानले चाहत्यांचे आभार ; सोशल मीडियावर थँक्स नोट केली शेअर...

3. 2018 Every Is A Hero : '2018 एव्हरी इज ए हिरो' चित्रपटाची ऑस्करसाठी झाली एंट्री...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.