मुंबई - Salaar Box Office Collection Day 3 : साऊथ अभिनेता प्रभास स्टारर 'सालार'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. रिलीज होताच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 90 कोटीच्या जवळपास ग्रँड ओपनिंग केली. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'सालार'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी झेप घेतली आहे. पहिल्या वीकेंडला हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल असं सध्या दिसत आहे. 'सालार' या चित्रपटामध्ये प्रभास अॅक्शन मोडमध्ये दिसला आहे.
'सालार'चं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'सालार'ला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाची टक्कर सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपटाशी आहे. 'सालार'च्या धमाकेदार ओपनिंगनं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार देशांतर्गत रिलीजच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी या चित्रपटानं 90.7 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 55 कोटीचा या चित्रपटानं व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 145.70 कोटी झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या तिसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 'सालार' 10.25 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 159.57 होईल .
'सालार' पाहण्यासाठी प्रेक्षक करत आहे गर्दी : हा चित्रपट पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं चित्रपटगृहात पोहोचत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अनेक चित्रपटगृह हाऊसफुल्ल होती. 'सालार'नं जगभरात सुमारे 180-200 कोटी रुपयांची कमाई केली आहे.'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' नंतर प्रभासच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'सालार'चाही समावेश होऊ शकतो. 'सालार'चं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि टिनू आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. प्रभास स्टारर 'सालार'नं तर अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत शाहरुखच्या 'डंकी' चित्रपटाला मागं टाकलं होतं.
हेही वाचा :