हैदराबाद - बाहुबली फेम प्रभास पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. त्याच्या आगामी राजा डिलक्स या मारुती दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग सुरू असून याच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ लीक झाला आहे.
राजा डिलक्सच्या सेटवरील फोटोत प्रभास दिग्दर्शक मारुतीशी एका मुद्द्यावर चर्चा करताना दिसतो. व्हिडिओमध्ये प्रभास शॉटची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. अंदाजानुसार, प्रभासचे चाहते सुपरस्टारला पुन्हा फॉर्ममध्ये पाहून आनंदित झाले आहेत. राज डिलक्स सेटवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फिल्म युनिटच्या सूत्रांनुसार, राजा डिलक्समध्ये प्रभास तीन आघाडीच्या नायिका मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार भूमिका साकारत आहेत. या कॉमेडी-हॉरर चित्रपटात तो दोन व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलीवूड स्टार संजय दत्त यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
-
Song shoot?#Prabhas #PrabhasMaruthi pic.twitter.com/BX3DUmfAj0
— Prabhas DOMAIN (@Prabhas_Domain) December 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Song shoot?#Prabhas #PrabhasMaruthi pic.twitter.com/BX3DUmfAj0
— Prabhas DOMAIN (@Prabhas_Domain) December 25, 2022Song shoot?#Prabhas #PrabhasMaruthi pic.twitter.com/BX3DUmfAj0
— Prabhas DOMAIN (@Prabhas_Domain) December 25, 2022
बाहुबली द्वारे भारतभर प्रसिद्धी मिळविलेल्या प्रभासने राधे श्याम सोबत रोमँटिक चित्रपटातून आपल्या मुळच्या फॉर्मवर परतण्याचा प्रयत्न केला होता पण तो कमी पडला. राजा डिलक्समध्ये प्रभासच्या कॉमेडी टायमिंग आणि हुशारीचा योग्या उपयोग केला जाणार आहे.
-
Rebelstar #Prabhas from the sets of #RajaDeluxe 🥵🔥🔥🔥 pic.twitter.com/AKBQmQRKa6
— Prabhas DOMAIN (@Prabhas_Domain) December 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rebelstar #Prabhas from the sets of #RajaDeluxe 🥵🔥🔥🔥 pic.twitter.com/AKBQmQRKa6
— Prabhas DOMAIN (@Prabhas_Domain) December 24, 2022Rebelstar #Prabhas from the sets of #RajaDeluxe 🥵🔥🔥🔥 pic.twitter.com/AKBQmQRKa6
— Prabhas DOMAIN (@Prabhas_Domain) December 24, 2022
बाहुबली नंतर प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांमध्ये प्रभासने केलेल्या हेवी लिफ्टिंगला ब्रेक म्हणून राजा डिलक्सची योजना केलेली दिसते. अभिनेता सध्या सालार, आदिपुरुष आणि प्रोजेक्ट के या बिग-तिकीट चित्रपटांसह अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे.
प्रभास सैफ अली खान, क्रिती सॅनन आणि सनी सिंग यांच्यासोबत ओम राऊत यांच्या आदिपुरुष नावाच्या पौराणिक चित्रपटात काम करणार आहे, ज्याचे एकाच वेळी हिंदी आणि तेलुगू दोन्ही भाषेत चित्रीकरण केले जात आहे. 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणारा मेगा व्हिज्युअल एक्स्ट्रावागान्झा 16 जून 2023 ला पुढे ढकलला गेला कारण निर्मात्यांना प्रेक्षकांना संपूर्ण व्हिज्युअल अनुभव देण्यासाठी आणखी वेळ हवा होता. या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर त्यावर प्रचंड टीका झाली. या चित्रपटाचे ग्राफिक्स अत्यंत सुमार दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला. तसेच यातील लंकापती रावणाची भूमिका करणारा सैफ अली खानलाही टारगेट करण्यात आले. यातील दृष्ये खटकणारी आहेत असाही प्रचार झाला. अखेरीस या चित्रपटाचे प्रमोशन पुढे ढकलून वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न निर्मात्याकडून सुरु आहे. त्याच्या आगामी चित्रपटांच्या स्लेटमध्ये सालार आणि प्रोजेक्ट के या दोन पॅन-इंडिया चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा - विकी कौशलचा सांता अवतार, कॅटरिना कैफने कुटुंबासह साजरा केला ख्रिसमस