मुंबई : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर सतत चर्चेत असते. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून प्रियकर सचिनला भेटलेल्या सीमा हैदरबद्दल जाणून घेण्याची सध्या सर्वांनाच उत्सुकता आहे. अनेकजण सीमाला तिच्या देशात परत पाठवण्याची चर्चा करत असताना, 'गदर २'चे दिग्दर्शक अनिल शर्मा आणि सनी देओलसारखे स्टार्स त्यांच्या प्रेमाच्या समर्थनार्थ पुढे आले. अलीकडेच पाकिस्तानची सीमा हैदर हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी समोर आली होती.
चित्रपटासाठी ऑडिशन्स सुरू : दरम्यान आता मीडिया रिपोर्टनुसार सीमा आणि सचिनच्या प्रेमकथेवर चित्रपट बनणार आहे. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक अमित जानी यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात येणार आहे. तसेच चित्रपटासाठी ऑडिशन्सही घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सीमा हैदरच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड करण्यात आली असून सचिनच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स सुरू आहेत.
सीमा हैदरवर आधारित चित्रपटाचे हे शीर्षक असेल : मीडिया रिपोर्टनुसार सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाचे नाव 'कराची टू नोएडा' असणार आहे. चित्रपट निर्माते अमित जानी यांनीही या चित्रपटाच्या संदर्भात सीमा हैदर यांची भेट घेतली होती. इतकेच नाही तर सीमा हैदरला भारतात काम करण्याची ऑफर देणारे चित्रपट निर्माते अमित जानी यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान पोलीस सीमा हैदरची सतत चौकशी करत आहेत, त्यामुळे तिचा पती सचिन कामानिमित्त बाहेर जाऊ शकत नाही, यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेवर बनत असलेल्या चित्रपटावर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
सीमा हैदर लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण : सीमा हैदरला 'ए टेलर मर्डर स्टोरी'मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात सीमा हैदर रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील आठवड्यात 'कराची टू नोएडा'चे थीम साँग लाँच होणार असल्याचे माहित होत आहे. याशिवाय या चित्रपटाबाबत अमित जानी यांनी सांगितले की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे, मात्र तरी ते घाबरत नाहीत. 'कराची टू नोएडा' या चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड झाली आहे आणि ही अभिनेत्री लवकरच मीडियासमोर येणार आहे. चित्रपटाची शुटिंग ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगतले आहे. त्यानंतर 'कराची टू नोएडा' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
हेही वाचा :
- Rajinikanth's Jailer Releases Today : 'जेलर' जगभरात ४००० स्क्रीन्सवर रिलीज, जपानी जोडपे चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईत दाखल
- Kushi trailer launch: 'खुशी'साठी सामंथाची कितीही प्रतीक्षा करण्यास तयार होता विजय देवराकोंडा
- GADAR 2 SCREENING : सनी देओलच्या 'गदर २'चे सैनिकांसाठी खास स्क्रिनिंग, जवानांच्या घोषणांनी थिएटर दणाणले