मुंबई - पॉप सिंगर शकीराबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. करचुकवेगिरीच्या प्रकरणात सिंगरला आठ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. शकीरावर 2012 ते 2014 पर्यंत स्पॅनिश कर कार्यालयात हेराफेरी केल्याचा आरोप आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंगरला स्पॅनिश वकिलाने कराराची ऑफर दिली होती, परंतु शकीराने आरोपांचे निराकरण करण्यासाठी ते स्वीकारण्याऐवजी प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. शकीराने कायदेशीर कारवाईवर अवलंबून राहून या प्रकरणाची चौकशी करण्याचा पर्याय निवडला आहे. सध्या या खटल्याची सुनावणी आणि तारीख निश्चित झालेली नाही.
शकीराला 8 वर्षांची शिक्षा? - स्पेनच्या वकिलाने गेल्या शुक्रवारी स्पष्टपणे सांगितले की, ते सिंगरच्या विरोधात सुमारे आठ वर्षांच्या शिक्षेची मागणी करणार आहेत. कारण सिंगरने करचुकवेगिरीच्या याचिकेकडे दुर्लक्ष करून मोठी चूक केली आहे. यासोबतच ते सिंगरकडून ४५ मिलियन डॉलरच्या दंडाची मागणी करणार आहेत.
शकीरा जाणार कोर्टात - शकीराचे आतापर्यंत 60 मिलियन पेक्षा जास्त अल्बम विकले गेले आहेत. असे सांगितले जात आहे की सिंगरने बुधवारी याचिका फेटाळली कारण ती निर्दोष असल्याचे सिद्ध करू शकते. त्यामुळे शकीराने या याचिकेविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
तेव्हा काय झाले? - स्पॅनिश सरकारी वकील हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत. ते म्हणतात की शकीरा 2011 मध्ये स्पेनला गेली, जेव्हा तिचे एफसी बार्सिलोना डिफेंडर गेरार्ड पिक यांच्याशी संबंध उघड झाले, परंतु 2015 पर्यंत बहामासमध्ये कर रेसिडेन्सी कायम ठेवली होती.
शकीराचे वकील काय म्हणाले? - शकीराच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, 2013 ते 2014 दरम्यान शकीरा सिंगिंग शोमध्ये होती आणि त्यामुळे तिने आंतरराष्ट्रीय टूरमधून सर्वाधिक पैसे कमावले. 2015 मध्ये ती सर्व कर भरण्यासाठी स्पेनला गेली होती. शकीराच्या म्हणण्यानुसार, तिने स्पॅनिश कर अधिकाऱ्यांना 17.2 दशलक्ष युरो दिले आहेत आणि ती कर्जमुक्त आहेत.
हेही वाचा - 'डार्लिंग' प्रमोशनमध्ये रणबीर कपूरचा ब्लेझर घालून पोहोचली आलिया भट्ट