ETV Bharat / entertainment

पूजा सावंतने सांगितला स्कॉटलंडमधील स्काय डायविंगचा थरारक किस्सा

Pooja Sawant Exclusive Interview अभिनेत्री पूजा सावंतने यावर्षी चार चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. हिंतीतही तिनं विद्युत जामवालसोबत ‘जंगली’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. परंतु मराठीतच तिच्या प्रतिभेची कदर होते असं तिला वाटतंय. अलिकडेच तिनं 'मुसाफिरा' या चित्रपटाचं शूटिंग स्कॉटलंडमध्ये केलं. त्यावेळचे अनेक किस्से तिनं खास मुलाखतीत सांगितले आहेत.

Pooja Sawant
पूजा सावंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 5:19 PM IST

मुंबई - Pooja Sawant Exclusive Interview एक सौंदर्य स्पर्धा जिंकून पूजा सावंतने 'क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पोश्टर बॉईज, दगडी चाळ, वृंदावन, चीटर, बोनस, भेटलीस तू पुन्हा, बस स्टॉप, विजेता सारख्या अनेक चित्रपटांतून तिने भूमिका केल्या. पूजाने विद्युत जामवालसोबत ‘जंगली’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिची प्रमुख भूमिका असलेला 'मुसाफिरा' हा मराठी चित्रपट येऊ घातलाय. त्या चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांनी पूजा सावंत बरोबर गप्पा मारल्या, त्यातील काही अंश.

Pooja Sawant
अभिनेत्री पूजा सावंत

बरेच दिवस तुझा चित्रपट आलेला नाहीये. प्रेक्षकांना इतकी प्रतीक्षा का करायला लावतेस?

खरं आहे की बऱ्याच दिवसांत माझा चित्रपट प्रदर्शित आलेला नाहीये. परंतु वर्षभरात मी चार चित्रपटांचे शूटिंग केलं आहे. काही चित्रपटांचे पोस्ट प्रॉडक्शन सुरु आहे आणि शूटिंग संपल्यावर त्यावर माझा कंट्रोल नसतो. बरेच निर्माते रिलीज साठी घ्यावी तेवढी मेहनत घेताना दिसत नाही. प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा माझ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट पाहतेय. ‘माय डॅड्स वेडिंग’, 'ऋणानुबंध' यासह माझे इतर चित्रपट तांत्रिक फिनिशिंगमध्ये अडकले आहेत. 'मुसाफिरा'च्या प्रदर्शनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुष्कर जोगला क्रेडिट द्यायला हवं. तो यात अभिनय तर करतोच आहे परंतु तो चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता सुद्धा आहे. त्याने उत्तम प्लॅनिंग करून चित्रपटाचे शूट पूर्ण केले आणि लगेचच तो प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिला.

पुष्कर दिग्दर्शक म्हणून तुला कसा वाटला?

पुष्करने याआधी निर्माता म्हणूनही काम केले असल्याने त्याला टेक्निकल गोष्टींची माहिती आहे. त्याने दिग्दर्शक म्हणून उत्तम काम केले आहे, याचं अनेकांना आश्चर्य वाटेल. सेटवर तो नेहमी शांत असायचा. अनेकदा सेटवर गोंधळ असायचा तरीही त्याने कधीही आरडाओरडा केला नाही. तो नेहमी कूल राहतो. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे तो सर्वांची काळजी घेतो आणि त्यामुळे सेटवर तो प्रत्येकाचा लाडका होता. आणि त्याच्या गोड स्वभावामुळे सर्वचजण त्याला कोऑपरेट करायचे.

Pooja Sawant
अभिनेत्री पूजा सावंत

तू २००९-१० पासून मनोरंजनसृष्टीत असून आजही आहे तशी आहेस, त्याचे रहस्य काय?

रहस्य वगैरे काही नाही. मी खूप शिस्तप्रिय व्यक्ती आहे. मी रोज सकाळी ५ वाजता उठते. त्यानंतर तासभर व्यायामाला देते. मला जिम मध्ये जायला आवडत नाही. मी चालायला किंवा धावायला जाते. हेडफोन्स लावून, आवडतं संगीत ऐकत, सूर्याची कोवळी उन्ह अंगावर घेत, धावणं माझ्यासाठी मेडिटेशन आहे. तसेच शुद्ध ऑक्सिजन घेण्यावर आणि शुद्ध पाणी पिण्यावर माझा भर असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु मी कुठल्याही डायटच्या फंदात पडत नाही. ताजं आणि पौष्टिक आहार खाण्यावर माझा भर असतो. एकदा एका आहारतज्ज्ञाने मला, इतर काही गोष्टींबरोबर, भात सोडण्याचा सल्ला दिला. मी कोकणातली. भात म्हणजे आमचा जेवणातला प्रमुख घटक आणि तो सोडायचा म्हणजे प्राणवायू सोडण्यासारखे. त्यामुळे मी त्या डायटेशियनलाच बदलले.

'जंगली' नंतर तू हिंदी चित्रपटात दिसली नाहीस

हिंदी चित्रपटसृष्टीचे गणित वेगळे असावे. फक्त टॅलेन्ट हा तेथील निकष नसावा. मी बऱ्याच हिंदी प्रोजेक्ट्ससाठी ऑडिशन्स दिल्या आहेत परंतु अजूनतरी मला काही ऑफर झालेले नाही. पण खरं सांगायचं तर मला मराठीत उत्तम काम मिळतंय. माझ्या प्रतिभेचा इथे आदर होतोय. त्यामुळे मी उगाच पळत्याच्या मागे धावत नाही. मराठीत काम करताना घरात असल्यासारखे वाटते.

Pooja Sawant
पूजा सावंत आणि तिचा होणारा पती सिद्धेश चव्हाण

तुला तुझा रियल लाईफ "मुसाफिरा" मिळालाय, ज्याची सर्वत्र चर्चा आहे

हो. मला माझा लाईफ पार्टनर गवसलाय. त्याचे नाव आहे सिद्धेश चव्हाण. तो ऑस्ट्रेलियात असतो आणि चित्रपटसृष्टीशी त्याचा काहीही संबंध नाही. मी अभिनेत्री आहे हेसुद्धा त्याला ठाऊक नव्हते. त्याचे झाले असे की माझ्या आईच्या मैत्रिणीने त्याचे स्थळ माझ्यासाठी सुचविले. हो. अरेंजड मॅरेज साठी. मी त्याचे फोटो पहिले तेव्हाच तो मला आवडला होता. मी त्याला पहिला फोन केला. नंतर आम्ही भेटलो आणि एकमेकांचे अंतरंग समजायला मिळाले. प्रत्येक भेटीत तो मला जास्त आवडू लागला आणि त्यालाही मी. साधारण दीडेक वर्षे आम्ही एकमेकांना समजून घेण्यात घालवली आणि एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे कळलेच नाही. जेव्हा आम्हाला वाटले की आम्ही एकमेकांसाठी योग्य आहोत तेव्हा आम्ही घरच्यांना सांगितले की आम्ही लग्नासाठी तयार आहोत. माझे अरेंजड कम लव्ह मॅरेज आहे.

तुम्ही स्कॉटलंडला शूट केले. काही आठवणी?

अनेक मराठी चित्रपट लंडनमध्ये शूट झालेत आणि तेथील अनेक ठिकाणं मराठी प्रेक्षकांच्या परिचयाची झाली आहेत, अगदी गावखेड्यातील प्रेक्षकांच्याही. स्कॉटलंड अत्यंत सुंदर असून आमच्या चित्रपटात ते जास्त सुंदर दिसेल. अर्थात तिथे भयंकर थंडी होती. आणि मला थंडी सहन होत नाही. तिथे एक नवीन गोष्ट कळली ती म्हणजे थंडीत तुम्ही काही खाल्लं तर तुम्हाला अजून थंडी वाजते. साधारण तासाभरानंतर त्याची ऊर्जा तुम्हाला मिळते. दुसरी आठवण म्हणजे थंड वातावरणात योग्य एक्सप्रेशन्स देणं अवघड असतं. इतक्या थंडीत शूटच्यावेळी आम्हा मुलींना गरम कपडे न वापरता सीन्स करावे लागत होते. तिसरी गोष्ट म्हणजे थंडी असली तरी प्रखर सूर्यप्रकाश असायचा. आऊटडोअर शूट असल्यामुळे उन्हात थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु ते माझ्यासाठी हानिकारक होते कारण उन्हामुळे माझ्या स्किनवर वाईट परिणाम झाला. मी खूप टॅन झाले, स्किन खूपच सावळी झाली. चवथी गोष्ट म्हणजे मी स्काय डायविंग केले. म्हणजे मला करावेच लागले. मी साहसी खेळांपासून नेहमी दूर असते. परंतु सीनची डिमांड म्हणून मला स्काय डायविंग करायला सांगितले. मी पुष्करला खूप विनवण्या केल्या परंतु त्याने माझे एक ऐकले नाही. म्हणून हेलिकॉप्टर ने जाताना मी त्याला सोबत घेऊन गेले. हेलिकॉप्टर तुम्हाला पर्वताच्या टोकावर नेऊन सोडते आणि त्यात एकावेळी फक्त दोन जण बसू शकतात म्हणून मी पुष्करला माझ्याबरोबर घेऊन गेले. पुष्कर ने जंप मारली परंतु माझे अवसान गळाले होते. परंतु माझा इन्स्ट्रक्टर खूप चांगला होता त्याने मला धीर दिला आणि मी डोळे घट्ट मिटून घेऊन जंप मारली.

हेही वाचा -

  1. 'फायटर'मधील 'इश्क जैसा कुछ' गाणं लॉन्च, दीपिका आणि हृतिकच्या केमेस्ट्रीची चाहत्यांना भुरळ
  2. गीतकार संतोष आनंद आणि गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार
  3. आनंद पंडितच्या बर्थ डे पार्टीत सलमानने मारली अभिषेक बच्चनला मिठी, ट्रोलर्सनी उडवली खिल्ली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.