मुंबई - Pooja Hedge currently unavailable : चाहत्यांच्या नियमित संपर्कात राहून त्यांची सतत मनं जिंकणारी अभिनेत्री पूजा हेगडेनं सध्याच्या कामातून ब्रेक घेतलाय. पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी सध्या ती मालदीवला सुट्टीसाठी रवाना झालीय. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप शेअर करुन तिनं ही अपडेट चाहत्यांना दिलीय. यामध्ये ती बेटांचं राष्ट्र असलेल्या देशात पाण्यावर तरंगणाऱ्या झुल्यावर आराम करताना दिसतेय.
गुरुवारी रात्री पूजानं इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी एक व्हडिओ पोस्ट केलाय. यामध्ये ती शांतपणे झुल्यावर पहुडली आहे. मागे बेटवरील सुंदर निसर्गरम्य परिसराची झलक दिसतेय. आराम करताना तिनं ऑल-व्हाइट आउटफिट परिधान केलाय. क्लिप शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'सध्या उपलब्ध नाही.'
पूजानं व्हिडिओ क्लिप शेअर केल्यानंतर चाहते आणि नेटिझन्सनी तिच्या कमेंट विभागात जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'पूजा हेगडेचा सर्वात आनंदाचा दिवस.' 'स्लीपिंग ब्युटी', असं आणखी बरंच काही चाहते म्हणताहेत. 'तुझ्या सौंदर्याला मर्यादा नाही', असं एकानंलिहिलंय तर आणखी एका नेटिझननं, 'झोपण्यासाठी सर्वोत्तम जागा', असल्याचं म्हटलंय.
खरंतर तिची ही मालदीव सहल केवळ विरंगुळा म्हणून नाही. तर ती 13 ऑक्टोबर रोजी आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं तिनं मालदीवचं हे सुंदर लोकेशन निवडलंय. तिला वाढदिवसानिमित्त तिच्या पालकांकडून एक खास गिफ्ट मिळालंय. तिच्या आई वडिलांनी तिला शोले चित्रपटाचं पोस्टर भेट म्हणून दिलंय. ही भेट तिला भलतीच आवडली आहे. सिनेमाच्या इतिहासाचा एक भाग असलेला भारताचा आयकॉनिक चित्रपट शोले. या चित्रपटाचं पोस्टर वाढदिवसाची अनोखी भेट म्हणून दिल्याबद्दल तिन आपल्या आई आणि बाबांचं आभार मानलेत.
कामाचा आघाडीवर पूजा हेगडे 2023 मध्ये आलेल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसली होती. या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, जस्सी गिल, भूमिका चावला, जगपती बाबू आणि शहनाज गिल यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला होता आणि सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
हेही वाचा -