मुंबई - बॉलिवूडचा लोकप्रिय पार्श्वगायक जुबिन नौटियाल याने जीवघेण्या अपघातात वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. त्याने शुक्रवारी एक पोस्ट लिहून चाहत्यांचेही प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार मानले.
त्याचे आरोग्य अपडेट शेअर करताना, जुबिनने इंस्टाग्रामवर हॉस्पिटलमधील स्वत:चा एक फोटो कॅप्शनसह पोस्ट केला, "तुमच्या आशीर्वादांसाठी सर्वांचे आभार. देव माझ्यावर लक्ष ठेवून होता, आणि त्या भीषण अपघातात मला वाचवले. मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी बरा होत आहे. तुमच्या कधीही न संपणाऱ्या प्रेमाबद्दल आणि प्रेमळ प्रार्थनांबद्दल धन्यवाद."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जुबिन नौटियाल याने आपले आरोग्याचे अपडेट दिल्यानंतर चाहत्यांसह सेलेब्रिटींनी त्याच्यावर संदेशांचा वर्षाव केला. गायक-रॅपर बादशाहने लिहिले, "भाऊ लवकर बरा हो." गायिका कनिका कपूरने लिहिले, "तुला आलिंगन पाठवत आहे."
जुबिन नौटियालच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो आता ठीक आहे. तो पायऱ्यांवरून खाली पडला आणि जखमी झाला होता. यादुर्दैवी घटनेनत त्याची कोपर मोडली आणि डोक्याला दुखापत झाली, असे त्याच्या टीमच्या वतीने सांगण्यात आले होते.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुबिनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर जाऊन त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
दरम्यान, वर्क फ्रंटवर, जुबिनने गेल्या आठवड्यात दुबईमध्ये एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले. त्याने विकी कौशल स्टारर 'गोविंदा नाम मेरा' मधील 'बना शराबी' आणि काजोल स्टारर 'सलाम वेंकी' मधील 'यू तेरे हुए हम' ही गाणी देखील सादर केली आहेत.
हेही वाचा - 'गोविंदा नाम मेरा'मध्ये मराठमोळ्या पत्नीच्या भूमिकेत भूमी पेडणेकर