मुंबई - शाहरुख खानचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण साकार झाला असून बहुप्रतीक्षित पठाण चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. यश राज फिल्म्सचा (Yash Raj Films) हा नेत्रसुखद अॅक्शनपट पठाण आदित्य चोप्रा यांच्या महत्त्वाकांक्षी स्पाय युनिव्हर्सचा भाग असून त्यात शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम असे देशातील सर्वात मोठे सुपरस्टार्स काम करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पठाण चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवण्यासाठी एकीकडे त्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त गुप्त ठेवत निर्मात्यांनी हा ट्रेलर रिलीज केला. ट्रेलरपूर्वी दोन गाणी रिलीज करण्यात आली होती. यातील पहिले गाणे बेशरम रंग वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यावर प्रचंड टीकाही झाली. त्यानंतर पठाण चित्रपटवर बहिष्कार घालण्यासाठी एक मोठी मोहीम सुरु झाली होती. आता पठाणचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरचे चित्र मात्र वेगळे असू शकते.
अपेक्षेप्रमाणे, पठाण ट्रेलर या चित्रपटाची पॉवर-पॅक झलक आहे जी अॅक्शन प्रकारात एसआरकेचे पदार्पण करेल. त्याने यापूर्वी चित्रपटांमध्ये अॅक्शन केले असले तरी ते चित्रपट प्रामुख्याने रोमँटिक ड्रामा होते. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनात, शाहरुख स्वतःला आव्हान देत आहे.
पठाण चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. ट्रेलर रिलीज होताच इंटरनेटवर तुफान प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत. चित्रपटातील शाहरुख आणि जॉन अब्रहमची अॅक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. वयाच्या ५७ वर्षीही शाहरुखच्या शरीरयष्टीची लवचिकता लाजवाब आहे. यातील काही सीन्स त्याने ज्या चपळाईने केले आहेत त्याचे कौतुक होत आहे.
सामान्यपणे हॉलिवूड चित्रपटात पाहायला मिळणारी आक्रमक दृष्ये पठाणच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. रस्त्यावर, बर्फातून आणि हवेतून दिसणारी पाठलागाची दृष्ये लक्ष वेधून घेणारी आहेत. या चित्रपटाचे शूटिंग बहुतांशी जगभरातील मोहक लोकेशन्सवर पार पडले आहे. त्याचे नेत्रसुखद दर्शन यातून घडताना दिसते.
या चित्रपटात दीपिका पदुकोण एका गुप्तहेराची भूमिका करत आहे. तिनेही अत्यंत कठीण अॅक्शन स्टंट्स केलेले आहेत. शाहरुखसोबत तिची नेहमी उत्तम केमेस्ट्री जुळत असते याचा पुनःप्रत्यय या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.
ठाण ट्रेलर शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी देण्याचे वचन देतो जे किंग खानच्या सलग फ्लॉपनंतर परत येण्याची वाट पाहत होते. पठाण ट्रेलरमध्ये दीपिका आणि शाहरुख यांच्या चाहत्यांसाठी अनेक आकर्षणे आहेत. पठाणच्या ट्रेलरमध्ये दोन्ही स्टार्स ग्लॅमरस दिसत आहेत.
पठाण चित्रपट 25 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये प्रदर्शित होईल.