ETV Bharat / entertainment

Parineeti chopra and Raghav chadha : परिणीती चोप्राच्या होणाऱ्या नवऱ्यावर कावळ्याचा हल्ला, राघव चड्ढा ट्रोल - राघव चड्ढा ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा होणारा नवरा म्हणजेच आम आदमी पक्षाचा नेता राघव चड्ढावर कावळ्याने हल्ला केला आहे. दरम्यान आता या घटनेमुळे राघवला सोशल मीडियावर चिडविले जात आहे.

Parineeti chopra and  Raghav chadha
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा
author img

By

Published : Jul 26, 2023, 6:34 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा होणारा नवरा आणि राष्ट्रीय पक्षाचा आम आदमी पार्टीचा खास नेता राघव चड्ढा यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा हे संसदेच्या आवारात हल्ल्याचे बळी पडले आहेत. राघववर हा हल्ला कोणा एका व्यक्तीने नाही तर कावळ्याने केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर भाजप पार्टीने राघवला धारेवर पकडले आहे. राघव चढ्ढाचे संसदेच्या आवारातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये कावळ्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहे. राघव चढ्ढा संसदेच्या बाहेर फोनवर बोलण्यात व्यस्त असताना अचानक एक कावळा त्याच्या डोक्यावर आला आणि या कावळ्याने त्याच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Parineeti chopra and  Raghav chadha
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा

भाजपने शेअर केले ट्विट : राघव चड्ढा यांच्यावर कावळ्याचा हल्ला भाजपसाठी एक मजेदार गोष्ट बनली आहे आणि ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर पसरवून राघव चढ्ढा यांची खिल्ली उडवली जात आहे. भाजपने राघवचे एक जुने ट्विट शेअर केले आहे, ज्यामध्ये 'राम चंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा, हंस चुगेगा दाना बंदूक का, कौआ मोती खायेगा' असे या ट्विटमध्ये लिहिले आहे. या गोष्टीवरून राघवला प्रचंड सोशल मीडियावर चिडविल्या जात आहे. दरम्यान भाजपसोबतच काही यूजर्सही राघव चढ्ढाची खिल्ली उडवत आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव लग्न कधी करणार? : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाने १३ मे २०२३ रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये साखरपुडा केला होता. दरम्यान आता असे बोलले जात आहे की, या हाय-प्रोफाइल कपलचे यावर्षी हिवाळी लग्न होणार आहे. यासाठी या जोडप्याने उदयपूरमधील हॉटेल ओबेरॉय उदयविलासची निवड केली आहे. तसेच अनेक वेळा राघव आणि परिणीती लग्नाची शॉपिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले आहे, त्यामुळे लवकरच परिणीती आणि राघव हे लग्न बंधनात अडकणार आहे.

हेही वाचा :

  1. Prabhas returns : 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची झलक लॉन्च केल्यानंतर प्रभास मायदेशी परतला, पाहा व्हिडिओ
  2. SRK first song Zinda Banda : शाहरुखच्या 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाण्याचा खर्च १५ कोटी? वाचा सविस्तर
  3. Kargil Vijay Diwas 2023: अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चनने भारतीय सैन्याच्या शौर्याला केला सलाम...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.