मुंबई - Parineeti chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांचा विवाह 24 सप्टेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे झाला. तेव्हापासून हे जोडपे खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या विवाहाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. परिणीतीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिचा मालदिवचा आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. लग्नानंतर परिणीती ही कुटुंबासह मालदीवमध्ये सुट्टी घालविण्यासाठी गेली होती. तिनं इंस्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनचे फोटो यापूर्वी शेअर केले होते. यावेळी तिनं सहलीचा खूप आनंद घेत होता. या सहलीला तिच्यासोबत राघव चड्ढा हे आले नव्हते.
परिणीती चोप्रा राजकारणात येईल ? : परिणीती नुकतीच वडोदरा येथील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिला मुलाखतीत विचारण्यात आलं की, अभिनयातून राजकारणात येण्याच्या योजनांबद्दल तिनं काय विचार केला आहे. यावर तिनं उत्तर देत म्हटलं, "आमच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य मी तुम्हाला सांगते. राघव यांना बॉलीवूडबद्दल काहीही माहिती नाही आणि मला राजकारणाबद्दल काहीही माहिती नाही! त्यामुळे तुम्ही मला या क्षेत्रात येताना पाहाल असं मला वाटत नाही. आमचे जीवन सार्वजनिक असले तरी, आम्हाला संपूर्ण देशातून इतके प्रेम मिळेल याची कल्पना नव्हती. मला वाटते की तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर वैवाहिक जीवन सर्वोत्तम होते."
परिणीतीनं सांगितला जीवन जगण्याचा मंत्र : परिणीतीनं पुढं सांगितलं की, ''व्यवसाय आणि वैयक्तिक जीवन यात योग्य संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे. कामात व्यग्र असल्यामुळं मी वेळेवर जेवत नाहीत किंवा झोपत नाहीत, याबद्दल आपण अनेकदा अभिमानानं बोलतो. परंतु वैयक्तिकरित्या मला असं वाटत नाही की जीवन जगण्याचा हा योग्य मार्ग आहे. मी खरोखरच कठोर परिश्रम करण्यावर विश्वास ठेवते. मला माझ्या मित्रांना भेटणे आणि सुट्टीवर जाणे देखील आवडते. जेव्हा मी 85 किंवा 90 वर्षांची होईन आणि मागे वळून पाहीन, तेव्हा मला वाटले पाहिजे की, मी माझे आयुष्य जसे जगले पाहिजे होते तसे जगले आहे''. परिणीतीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटात दिसली आहे. यानंतर ती आगामी 'अमर सिंह चमकीला' या चित्रपटात दिसेल. हा चित्रपट 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
हेही वाचा :