ETV Bharat / entertainment

Parineeti Chopra Pictures : परिणीती चोप्रा लग्नानंतर गर्ल्सट्रिपवर ; फोटो झाले व्हायरल... - परिणीती चोप्रानं शेअर केले फोटो

Parineeti Chopra Pictures : अभिनेत्री परिणीती चोप्रा ही लग्नानंतर पहिल्यांदा गर्ल्सट्रिपवर गेली आहे. सध्या तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत.

Parineeti Chopra Pictures
परिणीती चोप्राचे फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 11:54 AM IST

मुंबई - Parineeti Chopra Pictures : अभिनेत्री परिणीती चोप्रा लग्नानंतर पहिल्यांदा घराबाहेर पडली आहे. तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये हनीमूनला गेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. फोटोंमध्ये परिणीती चोप्रा तिच्या हातात सुंदर बेबी पिंक रंगाच्या बांगड्या घातलेली दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर ती सध्या चांगला वेळ घालवत आहे. दरम्यान, आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ती केस मोकळे सोडून समुद्रकिनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसतेय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंना अनेकजणांनी लाईक केलंय.

परिणीतीनं व्हेकेशनचे फोटो केले शेअर : परीनं इंस्टाग्राम फोटोवर कॅप्शन लिहलं, 'मी हनीमूनवर नाही. हा फोटो माझ्या वहिनीने काढला आहे.' याशिवाय परिणीतीनं कॅप्शनमध्ये गर्ल्सट्रिप हा हॅशटॅगही लिहिला आहे. एका युजरनं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, 'परी तुझे लूक खूप खास आहे'. दुसऱ्यानं लिहिलं, 'असो, आजकाल ईडीचे लोक तुम्हाला पकडत आहेत. आणखी एका युजरनं लिहिलं की, 'मला वाटतं की तुझ्या पतीसोबत हनिमूनला जाण्यापेक्षा तुझ्या वहिनीसोबत हनिमूनला जाणं आणि तिच्याशी चांगले नातं जोडणं जास्त महत्त्वाचं आहे.' अशा अनेक कमेंट परीच्या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

उदयपूरमध्ये या जोडप्याचा भव्य विवाहसोहळा : परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच लग्न 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूरमध्ये झाले. नुकतेच तिनं 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये रॅम्प वॉकही केला. ती या कार्यक्रमाची शोस्टॉपर होती. लग्नानंतर ती पहिल्यादा फॅशन वीकमध्ये उपस्थित होती. यापूर्वी परीनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर समुद्रकिनाऱ्यावरचा, हातात कॉफीचा कप धरलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्येही तिनं हनीमूनवर नसल्याचे सांगितले होते. या फोटोमध्ये तिनं सांगितलं होतं की, ती गर्ल्सट्रिपवर आहेत. त्यानंतर ती कुठे मुक्कामी आहे या ठिकाणचीही झलक तिनं दाखवली होती.

हेही वाचा :

  1. Hema Malini 75th birthday : हेमा मालिनींच्या 75 व्या वाढदिवसाला सेलेब्रिटी स्टार्सची मांदियाळी
  2. Alia Bhatt jets off to Delhi : आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिल्लीला रवाना, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं होणार सन्मान
  3. Hema Malini 75th birthday: ईशा देओलनं आई हेमा मालिनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; फोटोही केले शेअर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.