मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा शनिवारी सकाळी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दिसले. हे जोडपे त्यांच्या लग्नाआधी आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र मंदिरात आले होते. मॅचिंग पांढऱ्या पोशाखात दोघे हात जोडून मंदिराच्या आवारात फिरताना दिसले. या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिणीतीने शीख धर्माच्या प्रमुख अध्यात्मिक साइटच्या भेटीची झलक तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत परिणीती आणि राघव पवित्र मंदिराच्या शांत पार्श्वभूमीसह एकत्र पोज देताना दिसत आहेत. परिणिती पांढरा कुर्ता सलवार परिधान केलेली दिसत आहे आणि तिने आपल्या दुपट्ट्याने डोके झाकलेली दिसत आहे. दुसरीकडे, राघवने राखाडी रंगाचा नेहरू कोट असलेला पांढरा कुर्ता-पायजमा घातला होता. याआधी हे दोघे अमृतसरच्या विमानतळावर येताना दिसले होते. यावेळी त्यांना विमानतळावर हजर असलेल्या पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. त्यांचे अमृतसर भेटेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
परिणीती गेल्या अनेक महिन्यांपासून 'आप'च्या खासदाराशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आहे. या दोघांनी १३ मे रोजी नवी दिल्लीतील कपूरथला येथील घरात त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंगठ्याची देवाणघेवाण केली. त्यांच्या एंगेजमेंटपूर्वी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले होते. परिणीती आणि राघव एकमेकांना डेट सुरू करण्यापूर्वी अनेक वर्षांपासून ओळखत होते. राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचे अतिशय बुद्धीमान खासदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे असलेल्या उत्कृष्ट वक्तृत्वामुळे त्यांची जनमानसात अपाट लोकप्रियता आहे.
अलीकडेच, हे जोडपे लग्नासाठी उदयपूरमधील लोकेशन्स शोधताना स्पॉट झाले होते. परिणीती तिची चुलत बहीण प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या पावलावर पाऊल ठेवून येथे लग्न करतील, असे सांगण्यात येते. व्यावसायिक आघाडीवर, परिणिती आगामी 'चमकिला'मध्ये दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट दोन प्रसिद्ध पंजाबी गायक अमरजोत कौर आणि अमर सिंग चमकिला यांच्याभोवती फिरतो.
हेही वाचा -
३. Deepika Padukone trolled : सोनाक्षी सिन्हाच्या लूकची 'कॉपी' केल्याने दीपिका पदुकोण ट्रोल झाली