मुंबई - Parineeti Raghav Chadha wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा सध्या टॉक ऑफ द टाऊन बनलीय. गेली काही महिने त्यांच्या भोवती सुरू अललेली चर्चा आता त्यांच्या लग्नमंडपापर्यंत पोहोचलीय. त्यांचे नातेवाईक, सहकारी कुचुंबीय आणि मित्र मंडली त्यांच्या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी उदयपूरला दाखल होत आहेत.
परिणीती आणि राघव बोहल्यावर चढण्याचा उद्देशानं राजस्थानातील उदयपूर शहरात शुक्रवारी दिल्लीहून दाखल झाले. या लग्नाला राजकारण, क्रिकेट, उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील सेलेबेरिटींची हजेरी असणार आहे. परिणीतीची चुलत बहिण ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा या लग्नाला हजर राहणार असल्याचे संकेत मिळालेत.
राघव आणि परिणीतीच्या नावातील अक्षरांच्या मेळ घालून रागनिती असे त्यांच्या जोडीला टोपण नाव देण्यात आलंय. तर या रागनितीच्या विवाहाचे संपू्र्ण वेळापत्रक तयार आहे. या ऐश्वर्य संपन्न भव्य सोहळ्याला शनिवारी सुरुवात झाली. विवाहपूर्व विधींपैकी एक महत्त्वाचा विधी म्हणजे चूरा समारंभ. हा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा कार्यक्रम द लीला पॅलेसच्या महाराजा स्वीटमध्ये सकाळी १० वाजता पारणितीच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थित पार पडला. या समारंभात वधूचे मामा आणि मामी तिला लाल बांगड्या भेट देतात. शनिवारी दुपारी १ वाजता शाही भोजनानं सोहळ्याला सुरुवात झालीय. संध्याकाळी ७ वाजता ९० च्या दशकातील थीमवर आधारित पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. या दशकातील सुरेल गाण्यावर पाहुणे थिरकणार आहेत.
मुख्य विवाह कार्यक्रम लीला पॅलेस येथे आयोजित केला जाणार आहे. विवाह सोहळा ताज लेक पॅलेसच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर पार पडेल. यासाठी राघवची एन्ट्री फिल्मी स्टाईलनं होणार आहे. तो घोडीवर बसून लग्न मंडपात येणार नाही तर तो ताज लेकच्या पाण्यातून बोटीने विवाहस्थळी एन्ट्री करणार आहे.
हा लग्नसोहळा परिणीती आणि राघवच्या चाहत्यांसाठी मोठा आकर्षणाचा विषय ठरला आहे. या स्टार स्टडेड विवाह सोहळ्याची झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत. आज या विवाह विधींना धमाकेदार सुरूवात झाली असून उद्या दोघेही लग्नबंधनात अडकतील.
हेही वाचा -
२. film based on Adi Shankaracharya : आदि शंकराचार्यंवर बनणार भव्य चित्रपट, आशुतोष गोवारीकरची घोषणा
३. Ji Le Jara film delayed : प्रियांका चोप्राच्या तारखा रखडल्या, 'जी ले जरा' चित्रपटाचं शुटिंग लांबणीवर