ETV Bharat / entertainment

Parineeti and Raghav look perfect : परफेक्ट पती पत्नी परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढाचे लग्नानंतरचे आकर्षक फोटो - पती पत्नी परिणिती चोप्रा आणि राघव

Parineeti and Raghav look perfect : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा रविवारी शाही विवाह सोहळा पार पडला. त्यांनी एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार केल्यानंतरचा पहिला फोटो प्रसिद्ध झाला आहे.

Parineeti and Raghav look perfect
परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 10:59 AM IST

उदयपूर (राजस्थान) - Parineeti and Raghav look perfect : आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा विवारी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात भांधले गेले. पती-पत्नी म्हणून त्यांनी एकमेकांचा स्वीकार केल्यानंतरचा त्यांचा पहिला फोटो आता प्रसिद्ध झाला आहे. परिणीती तिच्या गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर दिसते, तर राघवने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.

लीला पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. यात मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत चेहरे आणि दिग्गज राजकारणी यांची खास उपस्थिती होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान लग्नसोहळ्यासाठी घरचे कार्य असल्या प्रमाणे उपस्थित होते.

या लग्नसोहळ्याला टेनिस स्टार सानिया मिर्झा, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि मनीष मल्होत्रा यांची उपस्थित लक्ष वेधणारी होती. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा या लग्नाला हजर राहू शकली नाही मात्र तिची आई मधू चोप्रा हजर होती.

लग्नाच्या आदल्या दिवशी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये परिणीती आणि राघव यांच्या विवाहा निमित्य 90 च्या दशकाच्या थीमसह एक संगीत कार्यक्रम पार पडला. त्या अगोदर मुख्य विवाह सोहळ्यासाठी उदयपूरमध्ये येण्यापूर्वी, परिणीती आणि राघव यांनी दिल्लीतील नातेवाईक, मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी सुफी गाण्याचे आयोजन केले होते.

या जोडप्याचा 13 मे रोजी एंगेमेंट कार्यक्रम दिल्लीत पार पडला होता. या शाही समारंभात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे व परिणीतीची चुलत बहिण प्रियांका चोप्रासह यांच्यासह अनेक सेलेब्रिटी उपस्थित होते.

परिणीती आणि राघव एकमेकांना डेटिंग करायला सुरुवात करण्यापूर्वी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. राघव-परिणिती यांनी लंडनमध्ये एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेम कहानीला तिथूनच सुरुवात झाली असावी.

दरम्यान कामाच्या आघाडीवर परिणीती चोप्रा आगामी चमकीला चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट अमरजोत कौर आणि अमर सिंग चमकीला या दोन प्रसिद्ध पंजाबी गायिकांवर आधारित आहे. यासोबतच परिणीतीच्या हातात अक्षय कुमारसोबत 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट देखील आहे.

हेही वाचा -

१. Raghav Parineeti Wedding: परिणीती चोप्रा, राघव चड्ढा विवाहबद्ध! जाणून घ्या, त्यांचा आजचा रोमँटिक प्रवास

२. Ragneeti Weeding : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा-आप नेते राघव चढ्ढा विवाहबंधनात अडकले, चाहत्यांना फोटोची प्रतिक्षा

३. Ragneeti Wedding : लग्नसोहळ्यातील परिणीती-राघवचा पहिला फोटो आला समोर; शेअर करताच केले डिलीट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.