ETV Bharat / entertainment

'कडक सिंग' पाहून मी रडलो'; पंकज त्रिपाठीच्या चित्रपटाचा इफ्फीमध्ये प्रीमियर - 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

IFFI : गोव्यात आयोजित 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) 'कडक सिंग' चित्रपट दाखविण्यात आला. यादरम्यान पंकज त्रिपाठीनं त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली.

IFFI
इफ्फी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 11:52 AM IST

गोवा -IFFI : अभिनेता पंकज त्रिपाठी हा अनेक वेगवेगळ्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकला आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये त्यानं चांगला अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शेवटी तो 'फुक्रे 3' मध्ये दिसला होता. आता तो आगामी 'कडक सिंग' या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसेल. 'कडक सिंग' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची कहाणी खूप रहस्यमय असेल. गोव्यात झालेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'कडक सिंग' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.

'कडक सिंग' पाहिल्यानंतर पंकज त्रिपाठी भावूक : 'कडक सिंग' चित्रपटाबद्दल अधिक बोलताना पंकज त्रिपाठी म्हटलं होत की, 'मी चित्रपट पाहिला आणि तो पाहिल्यानंतर खूप भावूक झालो. हा एक उत्तम आणि वेगळा चित्रपट आहे. खरं तर मी चित्रपट पाहताना दोनदा रडलो. 'कडक सिंग' चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीनं बनवण्यात आला आहे. या चित्रपटातील पंकज त्रिपाठीच्या व्यक्तिरेखेचं ​नाव 'कडक सिंग' असल्यानं तो खऱ्या आयुष्यात 'कडक' आहे का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा पंकज त्रिपाठीनं हसत हसत म्हटलं, 'मी अजिबात कडक नाही, पण चित्रपट नक्कीच कडक असणार आहे.'

'कडक सिंग'ची स्टार कास्ट : पंकज त्रिपाठीचा 'कडक सिंग' चित्रपट झी5 (ZEE5)वर 8 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात पार्वती तिरुवोथु आणि संजना संघी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पंकज त्रिपाठीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक 'मैं अटल हूं' मध्ये शीर्षक मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. उत्कर्ष नैथानी लिखित 'मैं अटल हूं'मध्ये पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर 25 डिसेंबर 2022 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या 98 व्या जयंत्तीच्या दिवशी रिलीज करण्यात आलं होतं. या चित्रपटाचे निर्माते विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील कलाकारांच्या नावांची घोषणा
  2. कार्तिक आर्यनच्या एक्स गर्लफ्रेंडनं वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट शेअर
  3. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलावर आधारित पाच मराठी चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.