ETV Bharat / entertainment

outsider Taapsee Pannu : फिल्म इंडस्ट्रीच्या 'बाहेरील' अभिनेत्री तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती!

कोणत्याही चित्रपट घराण्याशी संबंधित नसणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ किंवा लेखक दिग्दर्शकांना बाहेरील आणि घराण्याशी संबंधितांना आतील म्हणण्याची एक पद्धत अलिकडील काही वर्षात सुरू झाली. बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म आहे, असा सूर अनेकदा आळवला जातो. यामुळे बाहेरुन आलेल्या कालावंतांना संधी मिळत नाही, असेही म्हटले जाते. पण या सर्वांना पुरुन उरत अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये आपली दशकपूर्ती केली आहे.

तापसी पन्नू
तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती
author img

By

Published : Apr 7, 2023, 11:25 AM IST

Updated : Apr 7, 2023, 12:30 PM IST

मुंबई - काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम वर खूप चर्चा सुरू होती आणि 'आतील' आणि 'बाहेरील' असा वाद सुरू होता. किंबहुना तो आताही आहे. परंतु पूर्वीच्या जोमाने नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टारडम मिळविणे हे अनेकांचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मायानगरी मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी येत असतात. त्यात अननुभवी लोकांचा भरणा जास्त असतो आणि केवळ ग्लॅमरला भुलून ही लोकं मुंबईत आलेली असतात. ॲक्टर बनण्यासाठी केवढी मेहनत घ्यावी लागते याची त्यांना कल्पना नसते.

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची मांदियाळी - मुंबईत येणाऱ्या गर्दीत ५-१० टक्के लोकं असतात, ज्यांनी रंगभूमीवर काम केलेले असते. तर काही अभिनय आणि तत्सम कोर्सेस करीत आलेले असतात. परंतु एक चान्स मिळणे हे चमत्कारापेक्षा कमी नसते. याउलट जी आधीच फिल्म इंडस्ट्रीत आहेत त्यांची मुले या क्षेत्रात येत राहतात आणि त्यांना सगळे सोप्पे जाते. स्टार किड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमातीला स्ट्रगल करावे लागत नाही. काही अभिनेते फक्त या स्टारकिड्सना, भले त्यांच्याकडे टॅलेंट असो वा नसो, घेऊन चित्रपट निर्मिती करीत असतात. त्यांचे चित्रपट फ्लॉप झाले तरी त्यांना आणखीन संधी मिळत असतात. याचा दूरगामी परिणाम म्हणजे इतर कलाकार, ज्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. परंतु संधी नाही. ते कुजत पडतात. ते परत जातात किंवा मुंबईत हलाखीच्या परिस्थितीत दिवस, वर्षे काढीत असतात. 'बाहेरून' आलेल्या काहींना संधी मिळाली व त्यांनी त्याचे सोने केले. परंतु अशा यशस्वी झालेल्या आर्टिस्ट्सना फिल्म इंडस्ट्रीमधील काही पॉवरफुल मंडळी त्रास देऊ लागली आणि त्यांना काम मिळू नये असा प्रयत्न करू लागली. त्याच सुमारास अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. तो फिल्म इंडस्ट्रीमधील आतल्या लोकांनी त्रास दिल्यामुळे झाला. असा समज निर्माण होऊन सामान्य जनता पेटून उठली. बॉयकॉट बॉलीवूडही टूम निघाली. यातूनच आतला आणि बाहेरचा हा वाद सुरू झाला.

अभिनेत्री तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती!

आऊट साइडर तापसीची एन्ट्री - बाहेरून आलेल्या आणि यशस्वी कलाकारांपैकी एक म्हणजे तापसी पन्नू आहे. सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटांत काम केल्यानंतर तिला चष्मेबद्दुर या हिंदी चित्रपटात दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी लॉन्च केले. त्यानंतर नाही म्हणायला तिचा प्रवास खडतर होता. परंतु आत्मविश्वास आणि कठोर मेहनत या जोरावर तापसीने फिल्म इंडस्ट्रीत आपली जागा बनविली. हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या पदार्पणाला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली. या दशकपूर्तीसाठी ती समाधानी आहे. आता तर ती स्वतः निर्माती सुद्धा बनली. तिने तिच्या निर्मितीसंस्थेचे नाव 'आऊटसायडर फिल्म्स' असे ठेवले आहे. अर्थात त्यातून बरेच काही अभिप्रेत होत असले तरी तापसी शांतपणे आपले मार्गक्रमण करीत आहे. तिने या १० वर्षांत आऊटसायडर ते आघाडीची अभिनेत्री असा पल्ला गाठला आहे आणि त्याबद्दल तिला गर्व आहे.

तापसी पन्नू
तापसी पन्नू

कठोर मेहनत हाच तापसीचा युएसपी - तापसी पन्नूने आपल्यासाठी एक वेगळे मार्ग चोखाळला. मध्यम धर्तीच्या चित्रपटांतून तिने सशक्त भूमिका साकारत वेगळे स्थान निर्माण केले. तिची हटके कथानकं असलेल्या चित्रपटांची निवड आणि अर्थातच तिची अभिनयसंपन्नता याच्या जोरावर तिने उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नाव कमावले. तिच्या निवडी तिची ओळख बनल्या आणि तिच्याकडे सशक्त भूमिका चालून येऊ लागल्या. तापसीचा 'युएसपी' म्हणजे कठोर मेहनत आहे. तिने ‘बेबी’मधील भूमिकेसाठी आत्यंतिक शारीरिक मेहनत घेत आपली निवड सार्थ ठरवली. 'पिंक' सारख्या समस्याप्रधान चित्रपटातून तिने अमिताभ बच्चन यांच्या खांद्याला खांदा लाऊन चित्रपटाला यशस्वी केले. तसेच ऋषी कपूर यांची भूमिका असलेल्या ‘मुल्क’ मधील भूमिकेत धर्मनिरपेक्षता दर्शवित सशक्त आरती मोहम्मदची भूमिका साकारली. समाजातील जातीय समस्येवर आधारीत भूमिकेचे आव्हान तिने लीलया पेलले. कठीण व्यक्तिरेखा साकारण्यात तापसी कधीच घाबरली नाही. स्त्रीत्वला सन्मान देणारी भूमिका तिने विचार-प्रवर्तक ‘थप्पड’ मधून साकारली आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. याचप्रमाणे तिने विविध सिनेमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपले फिल्म इंडस्ट्रीमधील स्थान घट्ट केले.

तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती
तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती

अभिनयात परिपक्वता - तापसी पन्नू ने 'सांड की आंख' मधील प्रकाशी तोमरच्या चरित्रात्मक भूमिकेत फिल्मफेअरची ट्रॉफी पटकावली. 'हसीन दिलरुबा' मधील तिची हटके राणी कश्यप, ज्यात ग्लॅमर आणि वास्तव हातात हात घालून होते, प्रेक्षकांना अचंबित करून गेली. विकी कौशल आणि अभिषेक बच्चन यांच्या भूमिका असलेल्या ‘मनमर्जियां’ सारख्या रोमँटिक चित्रपटातही तिने आपले कसब दर्शविले. 'शाबाश मिथु', 'लूप लपेटा', आणि 'ब्लर' सारख्या चित्रपटांमधील अभिनयाने तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती
तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती

यशाच्या पायऱ्या चढणारी तापसी पन्नू - तापसी प्रतिष्ठित ब्रँडचा चेहरादेखील आहे. ही तिच्या यशाची पावती आहे. चित्रपटसृष्टीतील 'बाहेरील' कलाकारांसाठी तापसी पन्नूचा प्रवास, स्वत:च्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही. तिची कधीही हार न मानण्याची प्रवृत्ती देखील प्रेरणादायक असेल. राजू हिरानी दिग्दर्शित आणि शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'डंकी' मध्ये तापसी मुख्य भूमिकेत दिसेल. तसेच तिची शीर्षक भूमिका असलेला 'फिर आयी हसीन दिलरुबा' निर्माणाधीन आहे.

तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती
तापसी पन्नूची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती

हेही वाचा - अभिनेत्री प्रियांका चोप्राने सहकुटुंब घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, बाप्पाचे दर्शन घेतानाचा फोटो व्हायरल

Last Updated : Apr 7, 2023, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.