ETV Bharat / entertainment

documentary on Honey Singh : ऑस्कर विजेती गुनीत मोंगा हनी सिंगच्या जीवनावर करतेय डॉक्युमेंटरी - हनी सिंगची डॉक्युमेंट्री फिल्म नेटफ्लिक्सवर

रॅपर यो यो हनी सिंगने त्याच्या तमाम चाहत्यांसाठी त्याने एक वाढदिवसानिमित्य खूशखबर दिली आहे. हनी सिंगच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री फिल्म बनवणार असून विशेष म्हणजे या फिल्मची निर्मिती ऑस्कर पुरस्कार विजेती निर्माती गुनीत मोंगा करणार आहे.

गुनीत मोंगा हनी सिंगच्या जीवनावर करतेय डॉक्युमेंटरी

author img

By

Published : Mar 15, 2023, 4:48 PM IST

मुंबई - लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रॅपर यो यो हनी सिंग आज आपला वाढदिव साजरा करत आहे. त्याच्या तमाम चाहत्यांसाठी त्याने एक वाढदिवसानिमित्य खूशखबर दिली आहे. हनी सिंगच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री फिल्म बनवणार असून विशेष म्हणजे या फिल्मची निर्मिती ऑस्कर पुरस्कार विजेती निर्माती गुनीत मोंगा करणार आहे. गुनीत मोंगा यांच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' या माहितीपटाला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हनी सिंगवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

हनी सिंगची डॉक्युमेंट्री फिल्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून चाहत्यांना रॅपरच्या आयुष्याची ओळख करून घेता येणार आहे. विशेष म्हणजे हनी सिंगची क्रेझ जगभरात आहे. त्याची गाणी तरुणाईला भुरळ घालत असतात. मात्र, हनी सिंगलाही अनेक वादांना सामोरे जावे लागले आहे. करिअरच्या शिखरावर असताना हनी सिंग झगमगत्या दुनियेपासून अचानक गायब झाला आणि त्यानंतर अचानक त्याने आपल्या आजाराची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या काळात तो प्रचंड निराशेच्या गर्तेत अडकला होता. एकंदरीतच, हनी सिंगचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे, जे आता पडद्यावर दिसणार आहे.

ऑस्कर विजेत्या सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या माहितीपटाची निर्मिती केली जात आहे. ही फिल्म मोजे सिंग दिग्दर्शित करणार आहेत. मूळचा दिल्लीचा रहिवासी असलेला हनी सिंगने 2003 मध्ये इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. त्याने स्टुडिओत रेकॉर्डिंग कलाकार म्हणून सुरुवात केली आणि नंतर तो भांगडा आणि हिप हॉप संगीत निर्माता बनला. हळूहळू त्याने आपल्या गाण्यांमधून चाहत्यांना मंत्रमुग्ध करायला सुरुवात केली. 2011 पर्यंत त्याची लोकप्रियता एका उंचीवर जाऊन पोहोचली. देसी कलाकर, ब्लू आईज, डोप शॉप आणि ब्राउन रंग यांसारख्या अनेक हिट गाण्यांनी त्याने बॉलिवूडमध्ये धमाल उडवून दिली. ही डॉक्युमेंट्री फिल्म हनी सिंगच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यावरही प्रकाशझोत टाकेल. त्याच्या कुटुंबीयांची आणि मित्रांची झलकही यात पाहायला मिळेल.

खरंतर अनेक मुलाखती व इतर माध्यमातून हिनी सिंग अनेकवेळा व्यक्त झाला आहे. त्याने आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यबद्दलही सांगितले आहे. परंतु एक गायक म्हणून त्याने केलेल्या सामन्यांचा सलग आढवा या फिल्ममधून घेतला जामार असल्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे. हनी सिंग हा भारतीय संगीत उद्योगातील एका नव्या बदलाचा साक्षीदार आहे. तरुणांमध्ये त्याची जबरदस्त क्रेझ अद्यापही आहे. या फिल्मच्या निमित्ताने त्याची जीवनकथा सर्वांसमोर मांडली जाणार आहे.

हेही वाचा - Mouni Roy toned body in bikini : मौनी रॉयने रंगीत बिकिनीसह मियामी बीचवर दाखविली अदा, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.