ETV Bharat / entertainment

'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये ऑरीनं केली धमाल, झाला ट्रोल - ऑरीनं केली धमाल

Orry :'द आर्चीज'च्या प्रीमियरला अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली, मात्र सर्वाच्या नजरा या ऑरीवर होत्या. त्यानं या कार्यक्रमात गोल्डन कलरचा ब्लेझर परिधान केला होता, ज्यावर पोकेमॉनचं प्रिंट होतं. आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Orry
ऑरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 8:27 PM IST

मुंबई - Orry : 'द आर्चीज'च्या प्रीमियरला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुहाना, खुशी, जान्हवी कपूर, शनाया कपूर आणि अनन्या पांडे, मलायका, अमृता अरोरा अर्जुन कपूर, आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे, रणवीर सिंग, कतरिना कैफ, जान्हवी कपूर, बच्चन कुटुंब आणि शाहरुख खानचे कुटुंब या प्रीमियर उपस्थित असून अनेकांच्या नजरा ओरहान अवात्रामणि उर्फ ओरीवर होत्या. ओरीनं 'द आर्चीज' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी स्टायलिश ब्लेझर ब्लेझर परिधान केला होता.

ऑरी झाला ट्रोल : ऑरीच्या गोल्डन ब्लेझरवर पोकेमॉनचं प्रिंट होतं. ऑरीनं त्याच्या सिग्नेचर हेअरस्टाइलसह प्रीमियरला हजेरी लावली होती. या प्रीमियरमध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. प्रीमियरदरम्यान ऑरीनं अनेक सेलेब्ससोबत पोझ देऊन फोटो काढली. सध्या त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑरीचे फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेकजण त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. ऑरीच्या व्हायरल झालेल्या फोटोवर एका युजरनं कमेंट करत लिहिलं, ''हा माणूस इतका का प्रसिद्ध आहे हे मला समजत नाही''. दुसऱ्या एकानं लिहिलं की, 'सेलिब्रेटी अशा प्रकारे पोझ कसे देऊ शकतात? या माणसासोबत''. आणखी एकानं लिहिलं, ''बस भाऊ, मला हा ओरी आता बघायची नाही''. अशा अनेक कमेंट या फोटोच्या पोस्टमध्ये यूजर करत आहेत.

'बिग बॉस 17' ऑरीनं केली होती एंट्री : अलीकडेच ऑरी रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17' मध्ये दिसला होता. शोमध्ये त्याची एंन्ट्री ही एक दिवसाची होती. ऑरीनं घरात खूप मजा केली आणि रात्री उशिरापर्यंत स्पर्धकांसोबत पार्टीही केली. पार्टीसाठी तो एका घरातून दुसऱ्या घरात फिरताना दिसत होता. ऑरीचा हा अनुभव खूप चांगला होता. 'बिग बॉस 17'मध्ये ऑरीचं बोलणं ऐकून सलमान खानही खूप हसला होता. ऑरी हा बॉलिवूडमधील अनेक पार्ट्यामध्ये दिसतो. तो बॉलिवूड सेलेब्ससोबत फोटो काढून कमाई करतो असं त्यानं 'बिग बॉस 17'मध्ये सलमानला सांगितलं होत.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल'चा जगभरात 500 कोटीचा टप्पा पार, देशांतर्गत झाली 300 कोटीची कमाई
  2. 'डंकी' ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी ट्रेलर, 'सालार'चाही मोडला विक्रम
  3. 'टायगर 3'च्या यशानंतर कतरिना कैफनं सलमान खानविषयी केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.